ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कधी सेक्युरिटी गार्ड होता, आता चमकदार कामगिरीमुळे झाली आयपीएलमध्ये निवड

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 11, 2024 10:09 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कधी सेक्युरिटी गार्ड होता, आता चमकदार कामगिरीमुळे झाली आयपीएलमध्ये निवड

शहर : मुंबई

आवड, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर व्यक्ती खूप पुढे जाऊ शकतो हे अनेकांनी दाखवून दिले आहे. क्रिकेटमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीवर मात करुन संघात जागा मिळवली आहे. आज आम्ही तुम्हाला एका अशा खेळाडूबद्दल सांगणार आहोत जो कधी सेक्युरिटी गार्ड होता. आता त्याची आयपीएलसाठी निवड झाली आहे.

क्रिकेटमध्ये आतापर्यंत असे अनेक खेळाडू आले ज्यांची परिस्थिती इतकी चांगली नव्हती. गरीब कुटुंबात जन्म झालेले अनेक असे खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यापर्यंत मजल मारली आहे. कोणी पाणीपुरी विकली, कोणी नोकरी केली तर कोणी कचरा देखील वेचला. पण आज त्यांनी चिकाटीच्या जोरावर मोठी गरुड झेप घेतली. आज आम्ही तुम्हाला एका अशा क्रिकेटर बद्दल सांगणार आहोत जो कधी सेक्युरिटी गार्डचं काम करायचा.

कोण आहे तो खेळाडू

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात ज्याने आपल्या गोलंदाजीने सगळ्यांना आश्चर्यचकीत केले त्या वेस्ट इंडिज संघाचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफने आता इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळतान दिसणार आहे. केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपरजायंट्सच्या संघात शामर जोसेफचा समावेश करण्यात आला आहे. लखनौ संघाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वुडच्या जागी शामरला आपल्या संघात घेतले आहे. शामरने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांत आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे.

सुरक्षा रक्षक म्हणून करायचा काम

शमर जोसेफ गयानामधील एका छोट्या शहरात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पण म्हणतात ना आवड असेल तर माणूस खूप पुढे जातो. क्रिकेटबद्दल त्यांचं प्रेम यामुळे त्याचा वेस्ट इंडिज संघात समावेश झाला. ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर शामरला संघात स्थान मिळाले आणि तेथे त्याने आपल्या उत्कृष्ट गोलंदाजीने चमकदार कामगिरी केली.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जो गुलाबी चेंडूने खेळला गेला. या सामन्यात शामरने आपल्या अदभुत गोलंदाजीच्या जोरावर सामनाच उलटून टाकला. शमरने दुसऱ्या डावात 7 विकेट घेत ऑस्ट्रेलियाला जोरदार धक्का दिला. शामरच्या ऐतिहासिक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिज संघ गुलाबी चेंडू कसोटीत ऑस्ट्रेलियाला पराभूत करणारा पहिला संघ ठरला.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमकदार कामगिरी

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शामर जोसेफने दोन कसोटी सामन्यात एकूण 13 विकेट घेतल्या. यामुळे त्याची मालिकावीर म्हणूनही निवड करण्यात आली. आता त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली आहे.

T20 मध्ये फक्त दोन सामन्यांचा अनुभव असलेल्या शामर जोसेफने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आपली प्रतिभा निःसंशयपणे दाखवली आहे, पण त्याला T20 मध्ये फक्त दोन सामने खेळण्याचा अनुभव आहे. एवढेच नाही तर शामरला टी-२० मध्ये एकही विकेट घेता आलेली नाही. अशा परिस्थितीत लखनौ सुपरजायंट्सच्या संघाने शामर जोसेफला आपल्या संघात समाविष्ट करून मोठा सट्टा खेळला आहे.

 

मागे

 कॅप्टन रोहित शर्मासाठी वाईट बातमी, हिटमॅन नावाला लागला कलंक, नेमकं काय झालं?
कॅप्टन रोहित शर्मासाठी वाईट बातमी, हिटमॅन नावाला लागला कलंक, नेमकं काय झालं?

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील कसोटी मालिकेदरम्यान रोहित शर्मासाठी वाईट बातम....

अधिक वाचा