ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

IPL 2021 :आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबरमध्ये होणार सुरुवात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2021 08:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

IPL 2021 :आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचं आयोजन दुबईत, सप्टेंबरमध्ये होणार सुरुवात

शहर : मुंबई

आयपीएलचा 14वा सीझन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आयपीएल रद्द झाल्यामुळे नाराज झालेले चाहत्यांना आयपीएलचं आयोजन पुन्हा कधी, केव्हा आणि कुठे करण्यात येणार याबाबत उत्सुकताही आहे. अशातच आयपीएलच्या आयोजनाबाबत मोठी बातमी हाती आली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या उरलेल्या सामन्यांचं आयोजन  15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत दुबई येथे करण्यात येणार आहे.

एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयपीएल सामने रद्द करण्यात आले होते. स्थगित झालेले सामने दुबई येथे घेण्यात येणार आहे. 15 सप्टेंबर ते 15 ऑक्टोबर या 25 दिवसांच्या कालावधीत 31 सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.

आयपीएलमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यानंतर IPL रद्द

दरम्यान, आयपीएलच्या 14व्या सीझनमध्ये आतापर्यंत 29 सामने पार पडले होते. त्यानंतर काही खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे आता आयपीएलचं आयोजन होणार का? झालं तर कुठे होणार आणि कधी होणार? यांसारखे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांच्या मनात आहेत. 4 मेरोजी मंगळवारी आयपीएल गवर्निंग काउंसिलची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत बीसीसीआयनं आयपीएल रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. बायो बबलमध्ये असूनही कोरोनाची लागण झाल्यानं बीसीसीआयच्या वतीनं आयपीएलचे उर्वरित सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्या

मागे

"आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित झाल्याने टीम इंडियाला फायदा"

"कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करावा लागल....

अधिक वाचा

पुढे  

माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता
माजी वेगवान गोलंदाजाचं जसप्रीत बुमराहबद्दल मोठं विधन, व्यक्त केली चिंता

जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजांमधील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून जगभरात प्रस....

Read more