By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
टीम इंडियाने काल अफगाणिस्तान विरुद्ध शेवटचा तिसरा T20 सामना कसाबसा जिंकला. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने या मॅचमध्ये एकूण 3 वेळा बॅटिंग केली. यात 2 वेळा तो सुपर ओव्हरमध्ये फलंदाजीसाठी उतरला. त्यावरुन आता मोठा वाद झाला आहे. कारण रोहित शर्माने आधी स्वतहून मैदान सोडलं होतं.
भारत आणि अफगाणिस्तान सीरीजमधील तिसरा शेवटचा सामना इतका उत्कंठावर्धक होईल, याची कदाचितच कोणी कल्पना केली असेल. या सीरीजचा निर्णय पहिल्या 2 सामन्यातच झाला. तिसरा सामना खूपच रोमांचक झाला. डबल सुपर ओव्हर झाली. बंगळुरुच एम चिन्नास्वामी स्टेडियम या सामन्याच साक्षीदार झालं, जिथे अफगाणिस्तानने सर्वोत्तम क्रिकेटच प्रदर्शन केलं. टीम इंडियाने कसाबसा हा सामना जिंकला. पण त्यासोबतच एक वादही झाला. अफगाणिस्तानसोबत धोका झाला का? रोहित शर्माने दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करण योग्य होत का?
बुधवारी 17 जानेवारीला बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना झाला. भारताने पहिली बॅटिंग करताना 212 धावा फटकावल्या. रोहितने शर्माने T20 मधील 5 वी सेंच्युरी झळकवली. अफगाणिस्तानने सुद्धा जोरदार पलटवार केला. शेवटच्या चेंडूवर मॅच टाय झाली. त्यानंतर सामना सुपरओव्हरमध्ये गेला. अफगाणिस्तानने पहिली बॅटिंग करताना 16 धावा केल्या. टीम इंडियाकडून रोहित आणि यशस्वी जैस्वाल मैदानात उतरले. त्यानंतर जे झालं, ते वादाच कारण बनलं.
सुपर ओव्हर पण टाय
सुपर ओव्हरमध्ये रोहित आणि यशस्वी 5 चेंडूपर्यंत क्रिजवर होते. त्यांनी 15 धावा केल्या होत्या. शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 2 धावांची गरज होती. त्यावेळी नॉन स्ट्राइकवर असलेल्या रोहितने अचानाक रिटायर होण्याचा निर्णय घेतला. रिंकू सिंहला मैदानात बोलावलं. रिंकू जास्त फिट असल्याने तो 2 धावा पळू शकतो, म्हणून कदाचित रोहितने असं केलं असाव. पण प्रत्यक्षात वेगळ घडलं. जैस्वाल आणि रिंकू फक्त 1 धाव काढू शकले. अशा प्रकारे सुपर ओव्हर पण टाय झाली.
रोहित शर्माला पुन्हा बॅटिंग कशी मिळाली?
नियमानुसार, आणखी एक सुपर ओव्हर होणार होती. आता टीम इंडियाला पहिली बॅटिंग करायची होती. भारताकडून रिंकू सिंह आणि रोहित शर्मा मैदानात उतरला. रोहितने पहिल्या 3 चेंडूत 11 धावा केल्या. पण पुढच्या दोन चेंडूंवर भारताने दोन विकेट गमावल्या. त्यानंतर रवी बिश्नोईने फक्त 1 रन्स देऊन 2 विकेट काढल्या. टीम इंडियाने हा सामना जिंकला. भारतीय टीमने मॅच जिंकली पण आता प्रश्न असा उपस्थित होतोय की, रोहित शर्माला पुन्हा बॅटिंग कशी मिळाली?
प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनची परवानगी लागते
क्रिकेटच्या नियमानुसार, एखादा फलंदाज आजारी किंवा दुखापत झाली, तर तो इनिंगच्या मध्यावर रिटायर होऊ शकतो. त्या फलंदाजाला रिटायर्ड हर्ट समजतात. तो पुन्हा फलंदाजीला येऊ शकतो. पण एखादा फलंदाज दुखापत किंवा आजारी असल्याशिवाय मैदान सोडत असेल, तर त्याला पुन्हा बॅटिंगची परवागनी मिळत नाही. असं करायच असेल, तर प्रतिस्पर्धी टीमच्या कॅप्टनची परवानगी लागते. अन्यथा त्याला रिटायर्ड आऊट मानलं जातं.
म्हणून रोहितला रिटायर्ड हर्ट मानता नाही येणार
सुपर ओव्हरच्या नियमानुसार, एखादा फलंदाज सुपर ओव्हरमध्ये बाद झाला तर, तो पुढच्या सुपर ओव्हरमध्ये बॅटिंग करु शकत नाही. सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केल्यानंतर तोच गोलंदाज पुढच्या सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करु शकत नाही. रोहितच्या बाबतीत त्याला दुखापत झाली नव्हती किंवा तो आजारी नव्हता, की ज्यामुळे त्याला रिटायर्ड हर्ट समजता येईल.
रोहित रिटायर्ड आऊट होता, मग….
रोहित शर्मा रिटायर्ड आऊट झाला होता का? या बद्दल कोणतीही माहिती अंपायर्सनी दिली नाही. मॅचनंतर कोच राहुल द्रविड म्हणाले की, रोहित रिटायर्ड आऊट झाला होता. आता द्रविड सांगतायत की, रोहित रिटायर्ड आऊट झालाय, तर त्याला पुन्हा बॅटिंगसाठी का पाठवलं? हे क्रिकेट नियमांच उल्लंघन आहे.
टीम इंडियाचा डोळा हा अफगाणिस्तान विरुद्ध मालिका 3-0 ने जिंकण्याकडे असणार आहे....
अधिक वाचा