ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांचा राजीनामा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 02:28 PM 2019-02-12T14:15:30+5:30

क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांचा राजीनामा

शहर : delhi

क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) लोकपाल डी. के. जैन यांनी या सदस्यांना नोटीस पाठवली होती.

भारतीय संघाच्या प्रशिक्षक पदाची निवड करण्याची जबाबदारी क्रिकेट सल्लागार समितीवर होती. माजी कर्णधार कपिलदेव यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीत अंशुमन गायकवाड आणि रंगास्वामी हे होते. या समितीने रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी फेरनिवड केली होती.  कपिलदेव हे समालोचक, एका कंपनीचे मालक, इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे सदस्य त्याच सोबत क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. त्यामुळे बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांनी क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्ष कपिल देव यांनाही परस्परहितसंबंधाच्या तक्रारीवरून नोटीस पाठवली असून १० ऑक्टोबपर्यंत आपले उत्तर देण्यास सांगितले आहे.

या आधी रंगास्वामी यांनी रविवारी सकाळी आपला राजीनामा प्रशासकीय समिती आणि बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांच्याकडे ई-मेलद्वारे पाठवला.

मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे आजीव सदस्य संजीव गुप्ता यांनी भारताच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करणाऱ्या सल्लागार समितीच्या तिन्ही सदस्यांविरोधात तक्रार केली होती

मागे

IPL 2020:  19 डिसेंबर ला लिलाव
IPL 2020:  19 डिसेंबर ला लिलाव

2020 वर्षात होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामाचं घोषणा झाली आहे. 19 डिसेंबर र....

अधिक वाचा

पुढे  

अमेरिकेच्या महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम
अमेरिकेच्या महिला धावपटूने मोडला उसेन बोल्टचा विक्रम

अमेरिकेची धावपटू, ३२ वर्षीय ऍलिसन फेलिक्स हिने IAAF World Championship या स्पर्धेतील मिश्....

Read more