By NITIN MORE | प्रकाशित: फेब्रुवारी 04, 2020 01:39 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
मुंबई : न्यूझीलंडच्या दौर्यावर असलेल्या भारतीय संघाने येथे टी-२० च्या ५ सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश दिला आहे. तथापि, अखेरच्या ५ व्या सामन्यात सलामीवीर रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात चिंतेचे वातावरण आहे, अशा स्थितीत कसोटी सामन्यासाठी रोहितच्या जागी शुभमन गिलची वर्णी लावण्यात आली आहे. तर दुखापतीमुळे संघातून बाहेर गेलेल्या शिखर धवनच्या जागी पृथ्वी शॉला संघात स्थान देण्यात आले आहे. त्याचबरोबर आता वनडेसाठी शुभमन गिलला संधी देण्यात आली आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी रोहितच्या जागी शुभमनला संधी देण्याचा निर्णय जाहीर केला. तर वनडेसाठी रोहितच्या जागी मयांक अग्रवालची निवड करण्यात आल्याचे बीसीसीआयने ट्विट केले आहे.
न्यूझीलंडमध्ये गेलेल्या भारतीय संघातून दुखापतीमुळे प्रथम शिखर धवन बाहेर गेला. तेव्हा त्याच्या जागी पृथ्वी शॉला पाठविण्यात आले. तर टी-२० च्या ५ व्या आणि अखेच्या सामन्यात हिटमॅन रोहित शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने संघाबाहेर गेला आहे. त्यामुळे त्याच्या जागी कसोटीत आणि वनडेत कोण खेळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. आता बीसीसीआयने शुभमन गिल आणि मयांक अग्रवालची निवड करून हा प्रश्नही निकाली काढला आहे.
मुंबई : न्यूझीलंडचा टी-२० सीरीजमध्ये टीम इंडियाने पराभव करून इतिहास ....
अधिक वाचा