ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुकुंद कर्णिक यांचे निधन

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुकुंद कर्णिक यांचे निधन

शहर : मुंबई

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार मुकुंद कर्णिक यांचे बुधवार सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. गेले काही दिवस ते मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त होते.

80 च्या दशकात क्रीडा विश्वात प्रसिद्ध असलेल्या षटकार या क्रीडा पाक्षिकाच्या निर्मितीची जबाबदारी कर्णिक यांनी दोन दशकांपेक्षा अधिक काळ सांभाळली होती. लोकमत दैनिकासाठीही त्यांनी काही काळ काम केले होते. प्रकाशन क्षेत्रात त्यांनी अक्षर प्रकाशन आणि सदामंगल प्रकाशनच्या अनेक पुस्तकांची निर्मिती आणि वितरणाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती.

शालेय क्रिकेट आणि क्लब क्रिकेट खेळणार्‍या क्रिकेटपटूंना ते नावानिशी ओळखायचे. क्रिकेटच्या निमित्ताने त्यांनी भारतभर अनेक रणजी आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वृतांकन केले. क्रिकेट कबड्डी आणि खो-खो खेळांवर त्यांचे विशेष प्रेम होते.

1996 पासून त्यांनी क्रीडा पत्रकारितेला सुरुवात केली. प्रत्यक्ष सामन्याचा आनंद घेत रिपोर्टिंग करण्याची आवड असणार्‍या कर्णिक यांनी अनेक वर्ष क्रीडा पत्रकारिता केली.

त्यांच्या पश्चात पत्नी नयना आणि कन्या मुग्धा असा परिवार आहे.

मागे

दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम
दिनेश मोंगियाचा क्रिकेटला रामराम

भारताचा क्रिकेटपट्टू दिनेश मोंगियाने वयाच्या 42 वर्षी क्रिकेटच्या सर्व प्र....

अधिक वाचा

पुढे  

रुपा गुरुनाथ क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष
रुपा गुरुनाथ क्रिकेट संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांची मुलगी रुपा गुरुनाथ यांची तामी....

Read more