ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 22, 2021 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

अवघ्या 16 व्या वर्षी कसोटी क्रिकेटमध्ये डेब्यू, त्याच्या 428 धावांच्या जोरावर संघाचा 951 धावांचा पर्

शहर : मुंबई

वय केवळ 16 वर्ष 221 दिवस इतकं असताना कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 428 धावांची खेळी आणि केवळ दोन कसोटी सामन्यांची कारकीर्द. पाकिस्तानच्या (Pakistan) आफताब बलोचची (Aftab Baloch) कारकीर्द ही अशी लहान, परंतु इटरेस्टिंग आहे. आज आफताबचा उल्लेख करण्याचं कारण इतकंच की  20 फेब्रुवारी 1975 ला तो त्याच्या कसोटी कारकीर्दीतील शेवटचा सामना खेळला होता. उजव्या हाताचा मध्यल्या फळीतील फलंदाज असण्याव्यतिरिक्त आफताब ऑफस्पिन गोलंदाजही होता. आफताबच्या क्रिकेट कारकिर्दीविषयी बोलायचे झाल्यास, त्यामध्ये त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फटकावलेल्या 400 धावांच्या खेळीचा उल्लेख करावाच लागेल. काहीच प्रतिभाशाली खेळाडूंना अशी कामगिरी करता आली आहे. आफताब अशा प्रतिभाशाली खेळाडूंपैकी एक आहे. (Pakistani batsman Aftab Baloch last test match on this day)

आफताब बलोचचा जन्म 1 एप्रिल 1953 रोजी कराची येथे झाला होता. नोव्हेंबर 1969 मध्ये अगदी लहान वयात ढाका येथे न्यूझीलंडविरुद्ध त्याने कसोटी क्रिकेटमध्ये त्याने पदार्पण केलं. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटपेक्षा प्रथम श्रेणी क्रिकेटमधील विक्रमी खेळीमुळे त्याला ओळख मिळाली. कराचीच्या नॅशनल स्टेडियमवर आफताबने बलुचिस्तानविरुद्ध मोठी खेळी केली होती. बलुचिस्तानच्या संघाने पहिल्या डावात 93 धावा केल्या होत्या. त्याला उत्तर देताना मैदानात उतरलेल्या सिंधने 7 विकेटच्या बदल्यात तब्बल 951 धावांचा पर्वत उभा केला होता. त्यापैकी 428 धावा एकट्या आफताबने फटकावल्या होत्या. त्यावेळी प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ही सहावी सर्वात मोठी धावसंख्या होती. सिंधने हा सामना एक डाव आणि 575 धावांनी जिंकला.

या खेळीच्या जोरावर आफताबला इंग्लंड दौर्‍यावर नेले गेले, पण त्यावेळी त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु 428 या अंकाने त्याचा पाठलाग सोडला नव्हता. आफताब इंग्लंड दौऱ्यावर असताना त्याला राहण्यासाठी जी रुम मिळाली होती, त्या रुमचा नंबरही 428 होता. एक वर्षानंतर, फेब्रुवारी 1975 मध्ये, बलोचचा पुन्हा एकदा संघात समावेश करण्यात आला. न्यूझीलंडविरुद्धच्या या सामन्यात बलोचने पहिल्या डावात 25 धावा केल्या. तर चौथ्या डावात पाकिस्तानला विजयासाठी केवळ 184 धावांची आवश्यकता होती. अशा परिस्थितीत बलोचला फलंदाजीची संधी मिळाली नाही.

172 सामन्यात 20 शतकांसह 9 हजाराहून अधिक धावा

पहिल्या कसोटीनंतर 1975 मध्ये त्याला 15 ते 20 फेब्रुवारी दरम्यान सहा वर्षांनंतर दुसरा कसोटी सामना खेळण्याची संधी मिळाली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या या सामन्यात आफताब पहिल्या डावात 12 धावांवर बाद झाला, पण दुसऱ्या डावात त्याने नाबाद 60 धावा केल्या. तथापि वेस्ट इंडीजचा संघ हा सामना अनिर्णित राखण्यात यशस्वी झाला. आफताबने दोन कसोटी सामन्यांच्या कारकीर्दीत 48.50 च्या सरासरीने 97 धावा केल्या. तर प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीत त्याने 172 सामन्यात 41.68 च्या सरासरीने 9171 धावा जमवल्या. यात 20 शतकं आणि 45 अर्धशतकांचा समावेश आहे.

मागे

….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण
….म्हणून मुंबई इंडियन्सने Arjun Tendulkar ला आपल्या ताफ्यात घेतलं, आकाश चोप्राने सांगितलं कारण

“अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबईच्या टीमसोबत राहून बरेच काही शिकू शकतो. सचिन....

अधिक वाचा

पुढे  

"आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित झाल्याने टीम इंडियाला फायदा"

"कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे आयपीएलचा 14 वा मोसम (IPL 2021) स्थगित करावा लागल....

Read more