ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2020 09:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघात 'आदित्य ठाकरे'!

शहर : मुंबई

यंदाचेआयपीएलयूएईमध्ये खेळवले जाणार असल्याची घोषणा झाल्यानंतर कोणता संघ फॉर्मात असणार, याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. सर्वच टीम्स नेटाने सराव करत आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) संघात गोलंदाज आदित्य ठाकरे याची निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी नावसाधर्म्य असलेला हा युवा क्रिकेटपटू आहे विदर्भाचा पोट्ट्या! ‘आयपीएलसाठी किती खेळाडू यूएईला न्यायचे, यावर बीसीसीआयने बंधन घातलेले आहे. पण यूएईमध्ये फलंदाजांना अधिकाधिक सरावासाठी विविधता असलेले गोलंदाज आवश्यक आहेत. ही गरज ओळखूनआरसीबीसंघ व्यवस्थापनाने वेगवान गोलंदाज आदित्य ठाकरेची निवड केल्याची माहिती आहे.

आदित्य ठाकरे हा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चांगली गोलंदाजी करत आहे. 2018 मध्ये झालेल्या 18 वर्षांखालील युवा विश्वचषकातही आदित्यने दमदार कामगिरी केली आणि तो प्रकाशझोतात आला. आदित्यने स्थानिक क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची वर्णी यावर्षी आरसीबीच्या चमूमध्ये लागल्याचे बोलले जाते.

फलंदाजांना सराव देण्यासाठीच आदित्यला आरसीबी संघाबरोबर यूएईला नेण्याचा निर्णय तूर्तास झाला आहे. मात्र नेट्समध्ये सराव करताना त्याची गोलंदाजी कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षकांना आवडली, तर त्याला मैदानात उतरण्याचा जॅकपॉटही लागू शकतो. आयपीएल खेळण्याचीही संधी मिळू शकते.

 

मागे

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास
आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज, मुंबईत युवा क्रिकेटपटूचा गळफास

आयपीएलमध्ये सिलेक्शन न झाल्याने नाराज झालेल्या मुंबईतील युवा क्रिकेटपटून....

अधिक वाचा

पुढे  

...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही
...म्हणून धोनीसाठी अखेरचा सामना आयोजित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही

आपल्या कारकीर्दीच्या समारोपासाठी अखेरचा सामना आयोजित करावा, अशी कोणतीही म....

Read more