ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

टिक टॉक चे नवीन अॅप लॉन्च; फेसबुकला मागे टाकून टिकटॉक बनले नंबर वन

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 04, 2020 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

टिक टॉक चे नवीन अॅप लॉन्च; फेसबुकला मागे टाकून टिकटॉक बनले नंबर वन

शहर : मुंबई

         नवी दिल्ली- व्हिडिओ मेकिंगसाठी बेस्ट मानले जाणारे TikTok अॅप अल्पावधीतच भारतात लोकप्रिय झाले. टिकटॉक बनवणाऱ्या चिनी कंपनीने आता नवे अॅप लॉन्च केले आहे. हे अॅप चाचणी पातळीवर असून, तब्बल १ लाख युजर्सनी हे अॅप डाऊनलोड केले आहे. बाइटडान्स कंपनीने आता म्युझिक स्ट्रिमिंग सर्व्हिस क्षेत्रात पाऊल ठेवले असून, Resso नामक अॅप लॉन्च केले आहे.

         रेसो अॅप चाचणी पातळीवर आहे. या अॅपच्या बीटा व्हर्जनची चाचणी सध्या भारत आणि इंडोनेशिया या दोन देशांत सुरू आहे. रेसो हे अॅप गुगल प्ले स्टोरवर उपलब्ध असून, आतापर्यंत १ लाखाहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केले आहे. या म्युझिक अॅपची स्पर्धा गाना, स्पॉटिफाय, विंक आणि अॅपल म्युझिक या अॅपशी असणार आहे.

फेसबुकला मागे टाकून टिकटॉक बनले नंबर वन

         हे अॅप मून व्हिडिओ आयएनसी या कंपनीने तयार केले आहे. एका रिपोर्टनुसार, टी-सीरिज आणि टाइम्स म्युझिक या कंपन्यांनी या अॅपसाठी भागीदारी केली आहे. एका म्युझिक प्लेयर कंपनीशी मोठी भागीदारी करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

      ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी या अॅपचे एक मोफत व्हर्जन उपलब्ध असून, यामध्ये जाहिरातींचा समावेश करण्यात आला आहे. तर, पेड व्हर्जनसाठी युजर्सना महिन्याकाठी ११९ रुपये खर्च करावे लागतील. भारतीय युजर्सना म्युझिक अॅपच्या माध्यमातून आपली आवडती गाणी ऐकण्याचा छंद आहे, असा अहवाल एका कंपनीकडून देण्यात आला आहे.

मागे

ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...
ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...

सोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच ....

अधिक वाचा

पुढे  

नोकियानेही मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणले
नोकियानेही मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणले

नोकियाने भारतात नवीन मीडिया स्ट्रीमिंग डिव्हाइस आणले आहे. नवीन डिव्हाइस न....

Read more