ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 28, 2019 02:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30

इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...

शहर : देश

टाटा मोटर्सनं आपली सब-कॉम्पॅक्ट 'सिडेन टिगोर'चं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केलंय. 'टिगोर ईव्ही' नावानं बाजारात दाखल झालेली ही गाडी XM आणि XT अशा दोन व्हेरियन्टमध्ये उपलब्ध आहे. त्यांची किंमत क्रमश: .९९ लाख आमि १०.०९ लाख रुपये आहे. उल्लेखनीय म्हणजे, 'टाटा टिगोर ईव्ही'ला फेम- अंतर्गत मिळणारी .६२ लाख रुपयांची सूट (सबसिडी) लागू आहे. टिगोर सध्या केवळ 'फ्लीट ऑपरेटर्स'साठी उपलब्ध आहे. म्हणजे, खासगी ग्राहक अद्याप ही गाडी विकत घेऊ शकणार नाहीत.

टिगोर ईव्ही स्टँडर्ड टाटा टिगोर सिडेनवर आधारित आहे. या इलेक्ट्रिक गाडीच्या दोन्ही व्हेरिएन्टमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, पावर विंडो, ब्लूटुथ कनेक्टिव्हिटीसोबतच हार्मन ऑडिओ सिस्टम, हाईट एडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि एडजस्टेबल फ्रंट हेडरेस्ट यांसारखे फिचर्स आहेत. तर XT व्हेरिएन्टमध्ये या फिचर्सशिवाय अलॉय व्हिल्स आणि इलेक्ट्रिक आऊट साईड रिअर व्ह्यू मिरर्सही देण्यात आलेत.

या इलेक्ट्रिक गाडीतही ड्युएल फ्रन्ट एअरबॅग्स, एबीएस आणि रिअर पार्किंग सेन्सर्स यांसारखे बेसिक सेफ्टी फिचर्स देण्यात आलेत. ही गाडी सफेद, निळा आणि सिल्व्हर रंगात उपलब्ध आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर टिगोर ईव्ही १४२ किलोमीटरपर्यंत चालू शकेल. केवळ १२ सेकंदात ते ६० किलोमीटर प्रती तासाचा वेग ही गाडी घेऊ शकते. या गाडीचा जास्तीत जास्त वेग ८० किलोमीटर प्रती तास आहे.

मागे

कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी
कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

गेल्या काही दिवसांपूर्वी DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत. ज्यात डीटीएच....

अधिक वाचा

पुढे  

रिलायन्स जिओची गिगा फायबर इंटरनेट सेवा लवकरच
रिलायन्स जिओची गिगा फायबर इंटरनेट सेवा लवकरच

येत्या ५ सप्टेंबरपासून रिलायन्स जिओची बहुप्रतीक्षित गिगा फायबर इंटरनेट स....

Read more