ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 10, 2019 01:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

ट्विटरवर मोदींनंतर दुसऱ्या स्थानावर काँग्रेसच्या या नेत्याने आपले नाव कोरले...

शहर : देश

सोशल मीडिया हे माध्यम आपल्या प्रतिक्रीया लोकांपर्यंत पोहोचवण्यात नेहमीच अग्रगण्य ठरलं आहे. त्यामध्ये टि्वटरचे मोठ्या प्रमाणात वापरकर्ते आहेत. टि्वटरने नुकताच लोकप्रिय वापरकर्त्यांचा अहवाल जाहीर केला आहे. त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रथम स्थान पटकावले आहे. 


निवडणूक जिंकल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘सबका साथ+ सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत’ हे टि्वट या वर्षाचे ‘गोल्डन ट्विट’ ठरले आहे. या ट्विटला तब्बल एक लाख १७ हजार १०० रीटि्वट, तर तब्बल चार लाख २० हजार लाइक्स मिळाले आहेत. यानंतर या अहवालात मोदीनंतर राहुल गांधी यांनी दुसऱ्या स्थानी आपले नाव कोरले आहे. अशी माहिती टि्वटरने दिलेल्या अहवालातून समोर आली आहे.


तसेच टि्वटरच्या या अहवाल यादीत यावर्षी प्रथमच राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातील पुरुष आणि महिला मान्यवरांची वेगवेगळी यादी जाहीर केला आहे. यामध्ये राजकारणातील महिलांमध्ये स्मृती इराणी सर्वाधिक लोकप्रिय आहेत. तर दुसऱ्या स्थानावर प्रियंका गांधी वड्रा आहेत. तर मनोरंजन क्षेत्रात सोनाक्षी सिन्हाला सर्वाधिक फॉलोअर्स असून त्यानंतर अनुष्का शर्माची वर्णी लागते. या यादीमध्ये व्यक्तींबरोबरच वर्षभरात ट्रेडींग मध्ये राहिलेले काही हॅशटॅगही जाहीर केले आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने ‘लोकसभा निवडणूक’ आणि ‘चांद्रयान २’ तर ‘पुलवामा’, ‘आर्टीकल ३७०’ हे हॅशटॅग ट्रेंडिंग आहेत.
 

मागे

एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठीही मोठी खुशखबर..!
एअरटेल पाठोपाठ व्होडाफोन-आयडिया ग्राहकांसाठीही मोठी खुशखबर..!

गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स जीओ सोबतच जवळजवळ सर्वच कंपन्यांनी आपल्य....

अधिक वाचा

पुढे  

टिक टॉक चे नवीन अॅप लॉन्च; फेसबुकला मागे टाकून टिकटॉक बनले नंबर वन
टिक टॉक चे नवीन अॅप लॉन्च; फेसबुकला मागे टाकून टिकटॉक बनले नंबर वन

         नवी दिल्ली- व्हिडिओ मेकिंगसाठी बेस्ट मानले जाणारे TikTok अॅप अल्....

Read more