ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 21, 2019 04:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कमी होऊ शकतं आपलं DTH बिल, नव्या नियमांची तयारी

शहर : मुंबई

गेल्या काही दिवसांपूर्वी DTH सेक्टरशी संबंधित बातम्या येत आहेत. ज्यात डीटीएचचं बिल कमी होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. TRAIचा हा नियम लागू झाला असून, आता चॅनेलच्या हिशेबानं पैसे द्यावे लागत आहेत. परंतु एका ताज्या रिपोर्टनुसार, डीटीएच बिल पहिल्यापेक्षा कमी होऊ शकते. ETच्या रिपोर्टनुसार, टेलिकॉम अँड ब्रॉडकास्टिंग रेग्युलेटर एक नवा नियम लागू करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा उद्देश ग्राहकांना येणारं केबल आणि डीटीएचचं बिल कमी करण्याचा आहे.ट्रायनं नवा जारी केलेल्या नव्या पॉलिसीवर ग्राहक समाधानी नाहीत. ब्रॉडकास्टिंगचं टॅरिफ कमी करण्यासाठी आमचं काम सुरू आहे. त्यामुळे ते कमी करण्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करावे लागतील ते पाहावे लागेल. जर कोणताही नवा नियम आल्यास सध्याच्या नियमांत बदल करण्यात येणार आहे. काही ब्रॉडकास्टर्सच्या मते, ट्रायला त्यांच्या टॅरिफमध्ये बदल करण्याचा अधिकार नाही.परंतु तो अधिकार ट्रायकडे असल्याचंही काहींचं म्हणणं आहे. परंतु नियमांमध्ये बदल करायचे की नाही ते सर्व बाजारावर निर्भर असल्याचंही ट्रायनं सांगितलं आहे. दुसरीकडे कुठल्याही चॅनेलला 19 रुपयांपेक्षा जास्त चार्ज करता येणार नाही. नव्या नियमांनुसार अनेक युजर्सच्या मते त्यांचं बिल कमी झालं आहे. तर काही जण म्हणतात याचा काहीही फायदा झालेला नाही.  उलट टॅरिफ मोठ्या प्रमाणात वाढल्याचंही म्हटलं आहे.

 

मागे

टिक-टॉक कंपनीला आणि पर्यायाने युझर्सना तात्पुरता दिलासा
टिक-टॉक कंपनीला आणि पर्यायाने युझर्सना तात्पुरता दिलासा

तरुणाईमध्ये 'टिक-टॉक'चे प्रचंड प्रमाणात वेड आहे. तरुणाईत असलेल्या कलागुण....

अधिक वाचा

पुढे  

इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...
इलेक्ट्रॉनिक 'टाटा टिगोर' लॉन्च, जाणून घ्या किंमत...

टाटा मोटर्सनं आपली सब-कॉम्पॅक्ट 'सिडेन टिगोर'चं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्....

Read more