By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 02:19 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी सहावे ज्योर्तिलिंग म्हणजे ‘भीमाशंकर’. निर्सगाने मुक्त हस्ताने उधळून करून या परिसराला सजवले आहे. सह्याद्रीच्या पश्चिकडील पसरलेल्या एका रांगेवरील उंच डोंगरावर भीमाशंकर आहे. प्रचंड गर्द झाडी, जंगल व उंच डोंगराच्या कुशीत भीमाशंकराचे मंदिर वसलेले आहे.
महत्त्वाचं म्हणजे भारतातील बारा व महाराष्ट्रातील चार ज्योतीर्लिंगापैकी एक स्थान या डोंगरमाथ्यावर आहे. पुरातन दंतकथेत या परिसरातल्या राक्षसाचा नायनाट करण्यासाठी महादेवाने भीमरुपी अवतार धारण केला. मग युद्धात राक्षसाचा पराभव केल्यानंतर भक्तगणांच्या इच्छेनुसार महादेवाने इथेचं वास्तव्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून या स्थानास भीमाशंकर संबोधले जात असल्याची अख्यायिका आहे. काळ्याशार दगडातलं, हेमाडपंती धाटणीचं सुरेख मंदिर व पोर्तुगीज काळातली भली मोठी घंटा श्रद्धेच्या वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. मंदिराजवळच मोक्षकुंड, ज्ञानकुंड आहेत तर पश्चिमेस पापनाशक तीर्थ आहे. भोरगिरीकडे जाणाऱ्या वाटेवर २ किलोमीटरवर गुप्त भीमाशंकरचं स्थान आहे. नागफणी हा या भीमाशंकर परिसरातला सर्वोच्च माथा आहे. माथ्यावरुन स्वच्छ वातावरणात चौफेरचा दूरपर्यंतचा मुलूख व डोंगरमाथे फारच सुंदर दिसतात.
कसे जावे :
अजून काय पहाल :
ट्रेकिंग करणाºयांसाठी हे क्षेत्र म्हणजे पंढरपूरच आहे.
हडसर, चावंड, शिवनेरी, लेण्याद्री, ओझर हे अष्टविनायक गणपती.
भीमाशंकर ट्रेकसाठी घाट मार्ग
- शिडी घाट मार्ग २ गणपती घाटमार्ग ३ रानशिळ घाटमार्ग ४ बैलघाट ५ अहूपे घाट ६ भोरगिरी मार्गाने ७ कौल्याचा घाटमार्ग (कोथळीगड ते भीमाशंकर) ८ लोणावळा (भीमाशंकर वांद्रेखिंड मार्ग), ९ वाजंत्रीघाट सोपा मार्ग- राजगुरुनगरहून भोरगिरी गावापर्यंत जात येथून पश्चिमेकडे भीमाशंकर माथ्यावर चढाई करता येते. सुस्पष्ट जंगलवाट चढाईचा भार हलका करते.
श्रावणमध्ये भीमाशंकर येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येतात. आम्ही धबधब्याच्या पायथ्याशी होतो आणि गुप्त भीमाशंकरांच्या सुंदर शिव-लिंगाने आश्चर्यचकित झालो. खरोखर सर्वात आश्चर्यकारक भावनांपैकी एक! गुप्त महादेव वाहत्या नदीजवळ मंदिरापासून सुमारे अर्धा तास चालत आहेत. श्रावण रविवारी असल्यामुळे दर्शनासाठी खूप गर्दी आणि खूप लांब रांग असते.
पनवेलच्या ईशान्येला, मुंबई - पुणे मार्गावरील नेरळपासून पश्चिमेला तीन - चार क....
अधिक वाचा