ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 15, 2019 12:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पावसाळ्यात या ठिकाणांना द्या आवर्जून भेट!

शहर : मुंबई

पावसाला सुरुवात झाली की, फिरण्याची आवड असणारे लोक हे वेगवेगळ्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अनेकांना या दिवसात राज्याबाहेर जाऊन नैसर्गिक वातावरणाचा आनंदघ्यायचा असतो. जर तुम्हीही अशाच काही खास ठिकाणांच्या शोधात असाल तर आम्ही तुम्हाला काही खास पर्याय सांगत आहोत.

कोडायकनाल

तमिळनाडूमधील दिनदीगुल डोंगरांच्या मधोमध कोडायकनाल हे एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. इथे चारही बाजूंनी केवळ हिरवळ बघायला मिळते. पावसाळ्यात तर या ठिकाणी फारच सुंदर नजारा असतो.

देवरियाताल

मस्तुरा आणि सारी गावांजवळ हे ठिकाण आहे. पावसाळ्यात येथून दिसणारा नजारा बघण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते. या पावसाळ्यात आवर्जून भेट द्यायला हवी.

मुन्नार

केरळमधील पावसाळा किती सुंदर आणि आकर्षक असतो हे तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. केरळमधील मुन्नारला भेट देण्यासाठी अनेक पर्यटक पावसाळ्याची वाट पाहतात. कारण पावसाळ्यात इथे येऊन तुम्ही तुमच्या ताणतणावापासून मुक्ती मिळवू शकता.

बिष्णुपूर

पश्चिम बंगालच्या बंकुरा जिल्ह्यात हे ठिकाण असून पावसाळ्यात येथील नजारा मनमोहक असतो. येथील मंदिरे आणि डोंगर तुम्हाला कधीही अनुभवलेला अनुभव देतील.

जीरो

अरुणाचल प्रदेशातील जीरो या ठिकाणाचा समावेश वर्ल्ड हेरिटेजमध्ये आहे. अरुणाचल प्रदेशातील सर्वात सुंदर गावांमध्येही या गावाचा समावेश आहे. येथील निसर्गांचा आनंद घेण्यासाठी पावसाळ्यापेक्षा चांगला कोणताच ऋतू असू शकत नाही.

उदयपूर

उदयपूर हे राजस्थानमधील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. या शहराला तलावांचं शहर असंही म्हटलं जातं. इथे पावसाळ्यात फारच मनमोहक वातावरण असतं. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी असते.

मागे

देशद्रोह्याला धडा शिकवणारी वीरमती !
देशद्रोह्याला धडा शिकवणारी वीरमती !

‘चौदाव्या शतकात देवगिरी राज्यावर राजा रामदेव राज्य करत होता. यवन सम्राट (ब....

अधिक वाचा

पुढे  

धबधबा कर्जतचा
धबधबा कर्जतचा

कर्जतचा धबधबा हे एक प्रेक्षणीय स्थळ आहे. सर्वत्र पावसाळा सुरुवात झाल्यापास....

Read more