ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तीर्थक्षेत्र देहू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 05:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तीर्थक्षेत्र देहू

शहर : मुंबई

पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे एक मोठे संतश्री तुकाराम देहू गावी राहत. गाथा आणि अनेक अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात. श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबाचे नि:स्सिम भक्त. त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्र्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला जात असते.

संत तुकाराम महराजांचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकारामबीज) येथे मोठी यात्रा भरते. त्याच दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले असे मानतात. विठ्ठल मंदिर, जुने शिवमंदिर, इंद्रायणीचा डोह ही देहूतील बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर येथे कोरीव लेणीही आहेत. संत तुकाराम महाराज चिंतनासाठी, साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत. प्रत्येक गुरुवारी एकादशीच्या दिवशी मंदिरात कीर्तन होते. सध्या दिसणारे मंदिर . . १७२३ मध्ये संत तुकारामांचा सर्वात लहान मुलगा नारायणबाबा यांनी बांधून घेतले अशी नोंद आढळते.

मागे

सज्जनगड
सज्जनगड

सातारा शहराच्या नैऋत्येस अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर उरमोडी उर्फ उर्वशी न....

अधिक वाचा

पुढे  

तीर्थक्षेत्र आळंदी
तीर्थक्षेत्र आळंदी

संतश्रेष्ट ज्ञानेश्वरांचे समाधीस्थळ म्हणून आळंदी प्रसिद्ध आहे. याला देवा....

Read more