ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

श्रीक्षेत्र गणपतीपुळे

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 06:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीक्षेत्र गणपतीपुळे

शहर : मुंबई

रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती असाही शब्दप्रयोग वापरला जातो. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी पुळ्याच्या गणपती ही पश्र्चिमद्वार देवता मानतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. – अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.

या गावातील स्थानिक लोक घरोघरी स्वतंत्र गणपती बसवत नाहीत. सर्व जण एकत्र येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्चा करून गणेशोत्सव साजरा करतात.ज्या डोंगराला श्रीगणेश मानले जाते त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात. दरवर्षी ते फेब्रुवारी आणि ते नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात. अगदी समुद्र किनार्यावरच हे मंदिर असल्यामुळे लाटांचा घनगंभीर आवाज, अथांग सागर, नजरेच्या टप्प्यात मावणारा किनारा, अतिशय सुबक, रेखीव असे मंदिर आणि स्वयंभू श्रीगणेश असा विलक्षण अनुभव येथे मिळतो. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालताना सागराची रूपे, कोकणातला निसर्ग अनुभवता येतो.

मागे

तीर्थक्षेत्र जेजुरी
तीर्थक्षेत्र जेजुरी

पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून &ls....

अधिक वाचा

पुढे  

मांढरदेवी
मांढरदेवी

सातार्‍यातील वाईजवळ मांढरदेवी हे ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर टेक....

Read more