By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 29, 2019 06:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सातार्यातील वाईजवळ मांढरदेवी हे ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर टेकडीवर देवीचे देऊळ आहे. काळूबाई असे येथील देवीचे नाव असून, येथील काळुबाईची यात्रा प्रसिद्ध आहे.
पुण्यापासून सुमारे २०० कि. मी. अंतरावरचे हे ठिकाण १२०० मी. उंच टेकडीवर आहे. अरुंद वाटा असलेली चढण चढत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते.
शाकंभरी पौष पौर्णिमेला दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनाला येतात. मांगिरबाबांच्या देवळाशी नारळ फोडून, काळूबाईचे दर्शन घेणे आणि दीपमाळेत तेल घालणे अशा परंपरेसह भाविक दर्शन घेतात.
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथ....
अधिक वाचा