ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा....

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 27, 2020 01:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आपल्या घरात देखील आहे का नकारात्मक ऊर्जा ? तर हे 5 ऊपाय नक्की करून बघा....

शहर : मुंबई

घरात काहीही करता अस्वस्थता जाणवते, घरात येतातच मूड बिघडतं, घरातील गोष्टी लवकर खराब होतात. पूजा करण्याची इच्छा होत नाही एकमेकात देखील ताण तणाव राहत असेल तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा आहे. या नकारात्मक ऊर्जेला दूर करण्यासाठी काही उपाय सांगत आहोत.

1 मतभेदाचे वातावरण :

आपल्या घरात मतभेदाचे वातावरण असल्यास दररोज घरात गुग्गुळ, पिवळ्या मोहऱ्या आणि लोबानधुपाची काडी पेटवा आणि त्याचे धूर संपूर्ण घरात दाखवा, असे केल्याने फायदा तर होणारच तसेच मतभेदाचे वातावरण देखील नाहीसे होतील.

2 घरात असेल नेहमी भीतीचे वातावरण :

नकारात्मक ऊर्जेमुळे भीतीचे वातावरण असते. अश्या परिस्थितीत आपण पाण्यात लवंग आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून आपल्या कुळदेवांचे स्मरण करून पूर्ण घरात शिंपडावे या मुळे फायदा होणार.

3 घरात वास्तू दोष असल्यास :

मुख्य दारावर हळद आणि शेंदूर गायीच्या तुपात मिसळून 5 वेळा टिळक लावा आणि सकाळी सर्वप्रथम दार उघडल्यावर तांब्याच्या भांड्याने पाणी शिंपडावे, घरात कधीही नकारात्मक शक्ती प्रवेश करणार नाही.

4 आर्थिक कमतरतेमुळे घरातील वातावरणात बिघाड :

आर्थिक कमतरते मुळे घरातील वातावरण ताण तणावाचे बनतात. प्रत्येक जण दुखी राहतो. घरात नकारात्मकता पसरते, अश्या परिस्थितीत घरातील वरिष्ठ ती बाई असो किंवा पुरुष असो पिवळे कापडं घालून सकाळी घरातील सर्व सदस्यांकडून तांदूळ घेऊन त्याच बरोबर तूप घेऊन कोणत्याही धार्मिक स्थळावर द्यावे. हे उपाय गुरुवारी करावयाचे आहे, हळू हळू आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ लागेल.

5 सर्व काही असून देखील घरात शांतता नाही आपण कोणास शब्द दिले असल्यास आणि ते पूर्ण करत नसल्यास घरात नकारात्मकता येते. कोणाकडून उसनवारी घेतल्यास आणि त्याची परतफेड करण्यात जमत नसल्यास तरीही घरात आनंदी वातावरण राहत नाही. मुलं छळ करतात. अशामुळे आपण त्या व्यक्तीची माफी मागायला हवी ज्याला आपण काही करण्याचे शब्द दिले आहे आणि उधारी उसनवारी थोडं थोडं करून परत फेडा. शनिवारी अपंग आणि गरजूंना अन्न आणि कापड द्या. फायदा होणार.

मागे

प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी
प्रगतीत अडथळा आणतात कार्यालयाशी संबंधित या गोष्टी

प्रत्येकाची अशी इच्छा असते की त्याला / तिला आयुष्यात प्रगती मिळावी आणि त्या....

अधिक वाचा

पुढे  

केरसुणी ठेवण्याचे नियम आवर्जून पाळावे नाही तर...
केरसुणी ठेवण्याचे नियम आवर्जून पाळावे नाही तर...

वास्तू शास्त्रानुसार, केरसुणी किंवा झाडूबद्दल काही नियम सांगण्यात आले आहे....

Read more