ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नवरात्रीत या वास्तू टिप्सचा प्रयोग केला तर घरात भरभराहट होईल

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 28, 2019 02:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नवरात्रीत या वास्तू टिप्सचा प्रयोग केला तर घरात भरभराहट होईल

शहर : मुंबई

शारदीय नवरात्रीचा काळ फारच शुभ असतो. नवरात्रीत देवीची पूजा आराधना केल्याने वातावरण प्रसन्नचित्त जाणवत. या वेळेस देवीची पूजा करताना जर वास्तूच्या सोप्या उपायांचा विचार केला तर मनोवांछित फळांची प्राप्ती होते. तर जाणून घेऊया देवी आराधनेच्या या नऊ रात्रीत तुम्ही कशा प्रकारे वास्तू उपाय करून आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांती आणू शकता.

देवीचे स्वागत करण्याअगोदर घरात स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. आपल्या घरातील फालतू सामान जसे जुने जोडे चपला इत्यादींना घराबाहेर करावे. अस्वच्छता बिलकुल नाही ठेवावी. धूप दीप लावून वातावरण सुगंधित बनवायला पाहिजे. देवघराच्या आजू बाजू स्वच्छतेचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे.

नवरात्रीत मंदिराचा झंडा उत्तर पश्चिम दिशेत लावायला पाहिजे. देवीची प्रतिमा दक्षिणमुखी असायला पाहिजे, पण पूजा स्थळाचे नियम मंदिरापेक्षा वेगळे असतात म्हणून घरात आराधना पूर्व दिशेकडे तोंड करून करायला पाहिजे.

नवरात्रीत देवीच्या आराधनेसाठी देवीची प्रतिमा उत्तर पूर्व दिशेत ठेवायला पाहिजे. दक्षिण-पूर्व दिशेने अखंड ज्योत लावावी.

पूजेसाठी वापरलेले घागर एका लाकडी फळीवर ठेवा. पूजेच्या आधी हळद किंवा कुंकुमसह स्वस्तिक चिन्ह बनवा. यामुळे पूजा स्थळावर सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

ज्या जागेवर देवीची आराधना होते त्या जागेच्या सजावटीचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. देवघराची सजावट करताना रंगाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे. तेथे पांढरा, हलका पिवळा, हिरवा इत्यादी हलक्या रंगाचा पेंट करायला पाहिजे. देवीची पूजा करताना लाल रंगांच्या ताज्या फुलांचा वापर करावा.

 

 

मागे

घरातील पडद्यांचे देखील महत्त्व असत
घरातील पडद्यांचे देखील महत्त्व असत

वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही दिशेनुरूप पडद्यांचे रंग आणि डिझाइनची निवड ....

अधिक वाचा

पुढे  

चांगल्या झोपेसाठी वास्तू नियमांचा प्रयोग
चांगल्या झोपेसाठी वास्तू नियमांचा प्रयोग

आजकाल लोक गाढ झोप लागत नाही म्हणून त्रस्त असतात. रात्री बेचैनी जाणवते आणि मन....

Read more