ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोबाईलच घेणार चोराचा शोध

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 27, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मोबाईलच घेणार चोराचा शोध

शहर : औरंगाबाद

       औरंगाबाद – मोबाईल हरवण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये तर दिवसाला शेकडो मोबाईल हरवल्याच्या तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये येत असतात. हरवलेले मोबाईल शोधणं हे पोलिसांसाठी मोठं आव्हान असतं. शिवाय ज्याचा मोबाईल हरवलाय त्याच्यासाठी मोबाईल म्हणजे सर्वस्व हरवण्यासारखं असतं. चोरीला गेलेल्या मोबाईलची मोठी बाजारपेठ आहे. या बाजारपेठेच्या मुळावरच सरकारच्या CEIRनं घाव घातलाय. CEIR म्हणजे  सेंट्रल इक्वीपमेंट आय़डेंटीटी रजीस्टर सिस्टिम. आता तुमचा मोबाईल चोरीला गेला तरी सुद्धा तो कुणीही वापरू शकणार नाही. 


           मोबाईल हरवल्यानंतर तुम्ही मोबाईल आयएमईआय नंबर रजिस्टर केल्यास चोरलेला मोबाईल ट्रॅक करता येऊ शकतो. शिवाय तुम्ही सिमकार्डही ब्लॉक करु शकता. चोरीच्या मोबाईलमध्ये दुसरा सिम टाकल्यास पोलिसांना आणि तुम्हाला त्याची माहिती मिळते. चोरट्यानं काहीही केलं तरी तो स्वतःला लपवू शकणार नाही. चोरलेला मोबाईलच ब्लॉक झाल्यास तो पुन्हा विकता येणार नाही. या वेबसाईटचा जास्त वापर झाल्यास मोबाईल चोरीचं प्रमाण आपोआप कमी होईल असा विश्वास पोलिसांना आहे. 


        पर्सनल वॉलेट, पर्सनल पीसीचं काम करणारा मोबाईल तुमच्यासाठी अतिशय मौल्यवान आहे. तो हरवणार नाही याची काळजी घ्या. आणि हरवलाच तर CEIR वेबसाईटवरुन चोरलेल्या मोबाईलचा आणि चोराचा माग काढा.
 

मागे

Jio ने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’ केली लाँच
Jio ने ग्राहकांसाठी ‘2020 Happy New Year Offer’ केली लाँच

          मुंबई - रिलायन्स जिओने नव्या वर्षानिमित्त धमाकेदार ऑफर दिली आ....

अधिक वाचा