ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 10:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव

शहर : मुंबई

आरोग्यासाठी कोणतीही गोष्ट नियंत्रणात असली तरच ती फायदेशीर ठरु शकते. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा चांगला नसतो. तुम्ही जर आहारात मीठाचा अधिक वापर करत असाल तर हे तुमच्यासाठी हानीकारक ठरु शकते. तुम्ही जर मिठाचे अधिक सेवन करताय तर तुम्ही अनेक आजारांना आमंत्रण देत आहात.

जेवणात मीठाला खूपच अधिक महत्त्व आहे. कारण त्याच्या शिवाय जेवणाला चवच येऊ शकत नाही. त्यामुळेच मीठ किती महत्त्वाचे आहे याचा अंदाज येऊ शकतो. पण तुम्हाला माहितीये का की मीठाचे अधिक सेवन आपल्यासाठी किती घातक ठरु शकते.  यकृत, हृदय आणि थायरॉईड सारख्या अनेक अवयवांच्या सुरळीत कार्यासाठी मीठ आवश्यक आहे. पण त्याचा अतिरेक झाला की हेच मीठ आपल्या मृत्यूचे कारण पण बनू शकते. जास्त मीठ खाल्ल्याने नुकसान देखील होऊ शकते. अनेक लोकं जेवणात वरुन मीठ टाकून खातात. अशा लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास सुरू होऊ शकतो. ज्यामुळे शेवटी हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. मिठाच्या अतिवापरामुळे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. काय आहे मीठाच्या अधिक सेवनाचे दुष्परिणाम जाणून घ्या.

त्वचा रोग

अनेक जणांना मीठाचे अधिक सेवन केल्याने त्वचेच्या आजाराचा सामना करावा लागू शकतो. खाज येण्यापासून ते त्वचेवर जळजळ होणे, लाल पुरळ येणे अशा गोष्टींचा यात समावेश आहे.

केस गळणे

केस गळण्याची समस्या आता सामान्य झाली आहे. पण जर तुम्हाला देखील केस गळण्याची समस्या असेल तर तुम्ही मीठाचे सेवन कमी केले पाहिजे. यामध्ये जास्त सोडियम आहे. ज्यामुळे केसांची मुळे जास्त कमकुवत होतात.

हाडे कमकुवत होतात

मीठ जर तुम्ही अधिक प्रमाणात खालले तर तुम्हाला हाडांमध्ये असलेले कॅल्शियम हळूहळू कमी होण्याची समस्या जाणवते. मीठामुळे हाडे कमकुवत होऊ लागतात आणि नंतर ही कमकुवतपणा ऑस्टियोपोरोसिससारख्या गंभीर आजारात बदलते.

किडनीची समस्या

आपण जर जास्त मीठ खालले तर आपल्याला अधिक घाम येतो. किंवा लघवीतून देखील जास्त पाणी जावू शकते. यामुळे आपल्या किडनीला अधिक काम करावे लागते. यामुळेच किडनीचा त्रास होऊ शकतो.

रक्तदाब आणि हृदयरोग

जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याचा देखील धोका असतो. उच्च रक्तदाबाचे रुग्ण असाल तर जेवणातील मीठाचे प्रमाण ताबडतोब कमी केले पाहिजे. उच्च रक्तदाबामुळे हृदयवीिराराचा झटका येऊ शकतो. त्यामुळे हृदयविकाराच्या लोकांना देखील मीठाच्या सेवनावर नियंत्रण ठेवावे.

मागे

कॅन्सरपासून हृदयरोगापर्यंत शलगमची भाजी या समस्यांवर रामबाण उपाय
कॅन्सरपासून हृदयरोगापर्यंत शलगमची भाजी या समस्यांवर रामबाण उपाय

हिवाळ्यात आढळणारे शलगम ही खूप पौष्टिक भाजी आहे. याच्या पानांमध्येही भरपूर ....

अधिक वाचा

पुढे  

 नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…
नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर…

नवीन वर्षानिमित्त लोक त्यांच्या जीवनात बदल करण्यासाठी अनेक संकल्प  ठरवत....

Read more