ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, आरोपी 24 तासात अटकेत

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 06, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यात लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महिलेवर बलात्कार, आरोपी 24 तासात अटकेत

शहर : पुणे

बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने एका दुचाकीस्वाराने अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. आणि तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने लुबाडल्याचा प्रकार मुंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीत सोमवारी दुपारी घडला होता. त्या प्रकरणाची तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी जलद गतीने तपास करत 24 तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. रामचंद्र बनसोडे असे आरोपीचे नाव आहे. चाळीस वर्षीय महिलेने या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला फाथीमानगर ते लोणी काळभोर या मार्गावर बसची वाट पाहत उभी होती. याच वेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपीने फिर्यादी महिलेला कुठे जायचे अशी विचारणा केली? महिलेने त्याला सांगितल्यानंतर मी सुद्धा लोणी काळभोरला चाललो आहे असे सांगत फिर्यादीला लिफ्ट दिली. त्यानंतर त्याने दुचाकी अज्ञात स्थळी नेऊन महिलेवर बलात्कार केला आणि तिच्या अंगावरील दागिने काढून पळ काढला. अशी माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती.

आरोपीचे वय 50 ते 55 च्या दरम्यान असून त्याच्या दातावर काळा डाग असल्याची माहिती फिर्यादी महिलेने पोलिसांना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून घेत आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान फिर्यादी महिलेने सांगितलेल्या वर्णनानुसार हडपसर परिसरातील काळेपडळ येथे राहणाऱ्या रामचंद्र बनसोडे याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला तो 'तो मी नव्हेच' या अविर्भावात पोलिसांच्या प्रश्नाची उत्तरे देत होता. पोलिसी खाक्या दाखवताच त्यांने आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.

मागे

‘नेटफ्लिक्स’च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा!
‘नेटफ्लिक्स’च्या बनावट वेबसाईटपासून सावध रहा!

नेटफ्लिक्सच्या फेक वेबसाईट संदर्भात फसवणूक होण्याची शक्यता असून हे करणाऱ....

अधिक वाचा

पुढे  

सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब; सुनावणी २० ऑगस्टपर्यंत तहकूब
सुप्रीम कोर्टात विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची कागदपत्रे गायब; सुनावणी २० ऑगस्टपर्यंत तहकूब

सर्वोच्च न्यायालयात, फरार असलेल्या विजय मल्ल्याच्या फाईलमधून महत्त्वाची ....

Read more