ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 12, 2019 02:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या हत्येनंतर वातावरण तापलं, कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

शहर : calcutta

पश्चिम बंगालमधील हिंसाचार दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. मालदामध्ये एका सक्रिय भाजप कार्यकर्त्याची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पुरावे नष्ट करण्यासाठी त्याच्या शरिरावर अॅसिड टाकण्यात आलं आहे. इंग्लिशबाजार ठाणे परिसरातल्या कमलाबाडीच्या जदुपूरमध्ये ही घटना घडली आहे. असीम सिंह असं मृत भाजप कार्यकर्त्याचं नाव आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून निदर्शन सुरु झाली आहेत. कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी पाण्याचा मारा सुरु केला आहे. पोलिसांकडून अश्रृधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या. कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला आहे. यानंतर पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष वाढला आहे. सध्या पश्चिम बंगालमधील वातावरण बिघडलं आहे.

असीम सिंह रविवारपासून बेपत्ता होते. आज सकाळी त्यांच्या घरापासून जवळच त्यांचा मृतदेह सापडला. पोलीस आता पुढील तपास करत आहेत. भाजपनं असीम सिंह यांच्या हत्येचा आरोप तृणमूल काँग्रेसवर लावला आहे. भाजपचे नेते मुकुल रॉय यांनी पश्चिम बंगालमधल्या हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर जोरदार टीका केली.

असीम यांचा मृतदेह मिळाल्यानतंर भाजप कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली. यावेळी कार्यकर्त्यांनी ममता सरकार विरोधात घोषणाबाजी केली. याआधी बर्दवानमध्ये भाजपचे अध्यक्ष संजय दास यांच्या घरावर बॉम्ब हल्ला झाला होता. त्यांच्या घरावर देशी बॉम्ब टाकण्यात आला होता.

मुकुल रॉय यांची कारवाईची मागणी

ममता बॅनर्जी यांच्या प्रक्षोभक भाषणामुळे तृणमुलचे कार्यकर्ते हल्ले करत आहेत. याबाबत त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र देखील लिहिलं आहे.

 

मागे

यूपीत पत्रकारावर पोलिसांचा हल्ला, कॅमेरा तोडला - मूत्रही पाजलं
यूपीत पत्रकारावर पोलिसांचा हल्ला, कॅमेरा तोडला - मूत्रही पाजलं

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेशातील शामलीमध्ये रेल्वे पो....

अधिक वाचा

पुढे  

सोलापुरात वकील राजेश कांबळे यांच्या हत्येने खळबळ
सोलापुरात वकील राजेश कांबळे यांच्या हत्येने खळबळ

सोलापुरात वकिलाच्या हत्येने खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वकिलाच....

Read more