ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भिंतीवरून उडी मारून पळून गेलेल्या आरोपीला अखेर 33 वर्षांनी अटक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 10, 2019 06:06 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भिंतीवरून उडी मारून पळून गेलेल्या आरोपीला अखेर 33 वर्षांनी अटक

शहर : मुंबई

सोमवारी क्राईम ब्रँचने तुरुंगातून पळून गेलेल्या आरोपीला 33 वर्षानंतर अटक केली. चोरीच्या आरोपामध्ये अटकेत असताना आरोपीने भींतीवरून उडी मारून पळून गेला होता. क्राईम ब्रँचच्या युनीट 8 चे पोलीस अधिकारी अरुण पोखरकर आणि त्यांच्या पथकाने त्याला सोमवारी सलिम रुकिया खानला अटक केली. 1984 झालेल्या चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती, परंतु त्यानंतर सलिमने तुरुंगाच्या भींतीवरून उडी मारून पलायन केले होते. यानंतर त्याने गोरेगाव येथील राहते घर सोडून ठाण्यात मिरा रोड येथे लपून-छपून राहात होता. खबर्‍यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सापळा रचून  त्याला अटक करण्यात आली.
गेल्या 33 वर्षामध्ये त्याच्या पेहरावात बदल झाल्याने ओळख पटवणे अवघड होते, असे पोखरकर यांनी सांगितले. क्राईम ब्रँचने तब्बल एक महिना त्याच्यावर नजर ठेवली होती आणि ओळख पटल्यानंतर त्याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. नव्वदच्या दशकामध्ये चोरीच्या गुन्ह्यामध्ये सलिम आणि तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु सलिम पळून जाण्यात यशस्वी झाला होता.

मागे

छत्तीसगढमध्ये भाजपच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; पाच जणांचा मृत्यू
छत्तीसगढमध्ये भाजपच्या ताफ्यावर नक्षलवाद्यांचा हल्ला; पाच जणांचा मृत्यू

छत्तीसगढमध्ये दंतेवाडा परिसरात मंगळवारी नक्षलवाद्यांनी भाजपच्या ताफ्या....

अधिक वाचा

पुढे  

महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू
महिला पोलिसाचा अपघातात मृत्यू

अक्कलकोट-सोलापूर महामार्गावर कोन्हाळी येथे भीषण अपघात झाला. मुख्यमंत्री फ....

Read more