ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 03, 2019 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

बनारस हिंदू विद्यापीठात गोळीबार, एका विद्यार्थ्याचा मृत्यू

शहर : देश

बनारस हिंदू विद्यापीठ (BHU) परिसरात एका विद्यार्थ्याची  गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे विद्यापीठ परिसरात तणावाचे वातावरण पसरले आहे.

बनारस हिंदू विद्यापीठ परिसरातील बिर्ला हॉस्टेलजवळ मंगळवारी रात्री ही घटना घडली. हत्या करण्यात आलेल्या विद्यार्थ्याचे नाव गौरव सिंह असे आहे. गौरव सिंह हा बिर्ला हॉस्टेलसमोर आपल्या मित्रांसोबत होता. यावेळी दुचारीवरुन आलेल्या व्यक्तींनी गौरव सिंह याच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात गौरव सिंह गंभीररित्या जखमी झाला. त्याला बनारस बनारस हिंदू विद्यापीठातील ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान गौरव सिंह याचा मृत्यू झाला.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बनारस हिंदू विद्यापीठ परिसरात विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला. तसेच, घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला असून चार आरोपींना अटक केली आहे. व्यक्तिगत वादामुळे गौरव सिंह यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. गौरव सिंह हा बनारस हिंदू विद्यापीठात एमसीएचे शिक्षण घेत होता. तसेच, लाल बहादुर शास्त्री हॉस्टेलमध्ये राहत होता.  

मागे

भाजपा नेत्याच्या घरी सापडला शस्त्रांचा खजिना
भाजपा नेत्याच्या घरी सापडला शस्त्रांचा खजिना

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी संपूर्ण देशात सुरक्षा यंत्रणांकडून कडेकोट बंदो....

अधिक वाचा

पुढे  

कामाच्या व्यापामुळे पुलाची पाहणी शक्य झाली नाही - साहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते
कामाच्या व्यापामुळे पुलाची पाहणी शक्य झाली नाही - साहाय्यक अभियंता एस.एफ. काकुळते

दिव्यांग त्यातही राहायला विरारला असल्याने अशा अवस्थेत कामाच्या वाढत्या त....

Read more