ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, डॉक्टरांकडून महत्वाचे अपडेट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 03, 2024 06:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या झाडल्या, डॉक्टरांकडून महत्वाचे अपडेट

शहर : मुंबई

कल्याण डोंबिवली शहरात मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे शहरप्रमुख शरद गायकवाड याच्यावर सहा गोळ्या झाडल्या. पोलीस ठाण्यात हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडली आहे.

कल्याण डोंबिवली शहरात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा राजकीय राडा झाला. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यामध्ये सहा गोळ्या झाडल्या. या गोळ्या उल्हासनगर येथील हिललाईन पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षकासमोर झाडल्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या केबिनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. त्यात महेश गायकवाड आणि राहुल पाटील जखमी झाले. त्यांना सुरुवातीला उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र महेश गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याने ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता महेश गायकवाड यांच्या प्रकृतीसंदर्भात महत्वाचे अपडेट डॉक्टरांनी दिले आहे. त्याची माहिती कल्याण शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिली.

गोळ्या काढण्यात यश

गोपाळ लांडगे म्हणाले की, डॉक्टरांचा सांगण्याप्रमाणे महेश गायकवाड यांच्यावरती सहा गोळ्या झाडल्या होत्या. त्या गोळ्या काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. गोळ्या काढण्यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या आहे. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे देखील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपस्थित होते. महेश गायकवाड आणि राहुल पाटील यांची प्रकृती स्थिर आहे.

आमदार गायकवाड यांना अटक

उल्हासनगर फायरिंग प्रकरणात आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात गणपत गायकवाड, हर्षल केणे आणि संदीप सर्वांकर यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

द्वारली गावात जागेच्या वादा विकोपाला

गेल्या दोन ते तीन दिवसांपूर्वी उल्हासनगर हद्दीतील द्वारली गावात जागेच्या वादावरून शिंदे गटातील कार्यकर्ते आणि आमदारांमध्ये वाद झाला होता. त्या जागेवर बांधण्यात आलेली भिंत आज पुन्हा शिंदे गटाकडून पाडण्यात आली. त्यामुळे हा वाद मिटवण्यासाठी उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांच्या कार्यालयात पोहोचला. या वादादरम्यान आमदार गणपत गायकवाड त्याचा सहकारी आणि शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्याचा सहकारी राहुल पाटील हे पोलिसांसमोर मत मांडत होते. यावेळी दोन्ही गटात वाद होऊन गोळीबार झाला.

 

मागे

जिल्हा बँक थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?
जिल्हा बँक थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस, नेमकं प्रकरण काय?

नाशिक जिल्हा सहकारी बँकेकडून थकीत कर्ज प्रकरणी भुजबळ कुटुंबियांना नोटीस ब....

अधिक वाचा

पुढे  

 आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप; कोर्टात काय काय घडलं?
आमदार गणपत गायकवाड यांचा भर कोर्टात थेट मुख्यमंत्र्यांवरच गंभीर आरोप; कोर्टात काय काय घडलं?

भाजपचे नेते आणि कल्याणचे आमदार गणपत गायकवाड यांनी थेट शिंदे गटाचे माजी नगर....

Read more