ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2020 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

माहिममधील खासगी रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द, बीएमसीची कारवाई

शहर : मुंबई

माहिममधील फॅमिली केअर रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी जी उत्तर पालिकेने रद्द केली  आहे. कोरोनाबाधित रुग्णांकडून घेण्यात आलेले अधिक पैसे आणि एका रुग्णाच्या मृत्यूप्रकरणानंतर पालिकेने हा निर्णय घेतला आहे. त्यासोबत जी उत्तर पालिकेच्या कार्यालयात आतपर्यंत अनेक कोरोनामुक्त रुग्णांनी या रुग्णालयाची तक्रार केली होती.या निर्णयानंतर रुग्णालयात दाखल रुग्णांची 48 तासात अन्यत्र व्यवस्था करावी किंवा त्यांना घरी पाठवावे. तसेच नव्या रुग्णांना प्रवेश देऊ नये असे आदेशही पालिकेने दिले आहेत.

माहीममधील क्रॉस रोड क्रमांक 2, एम. एम. चोटानी मार्गावरीलफॅमिली केअरहॉस्पिटलमध्ये आतापर्यंत सुमारे एक ते दीड हजार कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात आले आहेत.

या रुग्णालयाने आपल्याकडून उपचारासाठी सरकारी दराऐवजी अधिक पैसे घेतल्याची तक्रार कोरोनामुक्त झालेल्या काही व्यक्तींनी पालिकेच्याजी-उत्तरविभागाकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने हा निर्णय घेतला.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्याचा कोरोना अहवाल नकारात्मक आला होता. तरीही त्यांच्यावर कोरोनाचे उपचार करण्यात येत होते. तसेच त्याला आवश्यक असलेले औषध आणण्यासाठी भलत्याच रुग्णाच्या नावाची चिठ्ठी देण्यात आली होती. रुग्णाचा मृत्यू आणि यापूर्वीच्याकारणे दाखवानोटीसला उत्तर दिल्यामुळेबॉम्बे नर्सिग होम रजिस्ट्रेशन ॅक्ट 1949’अंतर्गत रुग्णालयाची नोंदणी एक महिन्यासाठी रद्द करण्यचे आदेश पालिकेने दिले आहेत.

दरम्यान, कोरोनाच्या काळात मुंबईसह राज्यात अनेक रुग्णालयाबाबत नागरिकांनी तक्रारी दाखल केल्या आहेत. या काळात काही खासगी रुग्णालये कोरोना रुग्णांनाकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेत आहे.

मागे

आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक
आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल....

अधिक वाचा

पुढे  

पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक
पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग, आरोपी वॉर्डबॉयला अटक

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एकिकडे संपूर्ण आरोग्य यंत्रणा कोरोना विषाणूचा स....

Read more