ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी भटकळविरोधात आरोप निश्चित

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 30, 2019 12:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी  भटकळविरोधात आरोप निश्चित

शहर : पुणे

पुण्यातल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातला मुख्य आरोपी तसंच इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा संस्थापक यासिन भटकळविरोधात सोमवारी आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरोप निश्चितीसाठी भटकळला न्यायालयात प्रत्यक्ष हजर करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश किशोर वडणे यांनी दिले होते. त्यानुसार त्याला कडेकोट बंदोबस्तात पुण्याच्या न्यायालयात हजर करण्यात आलंभटकळवर देशभरातील विविध दहशतवादी हल्ल्यांप्रकरणी गुन्हे दाखल असून ठिकठिकाणच्या न्यायालयांत त्यासंदर्भातील खटले सुरू आहेत. तो सध्या तिहार जेलमध्ये आहे. जर्मन बेकरी खटल्याचं दोषारापपत्र २०१४ मध्येच दाखल झालंय मात्र सुनावणी सुरू झाली नव्हती. जर्मन बेकरी प्रकरणी सुरू असलेल्या खटल्याची पुढील सुनावणी १५ जूनला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार आहे.

फेब्रुवारी २०१० मध्ये पुण्यात झालेल्या कोरेगाव पार्क भागातील जर्मन बेकरी बॉम्बस्फोटात १७ जण ठार झाले होते तर जवळपास ६४ जण गंभीर जखमी झाले होते. सरकारी वकील उज्ज्वल पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भटकळविरोधात आयपीसीच्या स्फोटकं अधिनियम आणि बेकायदेशीर कृत्यं अधिनियमाच्या वेगवेगळ्या कलमांखाली आरोप निश्चित करण्यात आलेतयाआधी, २०१३ च्या हैदराबाद दुहेरी बॉम्बस्फोट प्रकरणात एनआयए न्यायालयानं भटकळला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलीय. पोलिसांनी २०१३ साली यासिन भटकळला भारत-नेपाळच्या सीमेवर अटक केली होती.

पुढे  

प्रसिद्ध भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना ड्रग्ज प्रकरणी  दोन वर्षांची शिक्षा
प्रसिद्ध भारतीय उद्योगपती नेस वाडिया यांना ड्रग्ज प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा

भारतीय उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री प्रिती झिंटा हिचा माजी प्रियकर नेस ....

Read more