ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सर्व आरोपींना कोर्टाचा दणका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 17, 2019 03:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : सर्व आरोपींना कोर्टाचा दणका

शहर : मुंबई

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा तरी सुनावणीसाठी कोर्टात उपस्थित रहाण्याचे आदेश राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) मुंबईतील विशेष न्यायालयाने दिले आहेत. या आरोपींमध्ये साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांचा देखील समावेश आहे. त्यामुळे कोर्टाने सर्व आरोपींना दणकाच दिला आहे. आरोपी सुनावणीसाठी गैरहजर असल्याने कोर्टाने नाराजी व्यक्त केली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी २० मे रोजी होणार आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटप्रकरणीसाध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, कर्नल पुरोहित यांच्यासह निवृत्त मेजर रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी या आरोपींवर बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भा. दं. वि. कलमांअंतर्गत बॉम्बस्फोटासारख्या दहशतवादी कारवाईचा कट रचणे, तो अमलात आणणे, त्यामुळे निष्पापांचा खून करणे, त्यांना गंभीररीत्या जखमी करणे इत्यादी गंभीर आरोपांतर्गत खटला चालवण्यात येत आहे. या प्रकरणी एनआयएच्या विशेष कोर्टात सुनावणी सुरु आहे. आज पार पडलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने या प्रकरणातील सर्व आरोपींनी आठवड्यातून किमान एकदा कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

 

मागे

शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड,शिक्षक गजाआड
शिक्षकाने वर्गात १२ अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचे उघड,शिक्षक गजाआड

पुणे जिल्ह्यात हवेली तालुक्यातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकाने वर्ग....

अधिक वाचा

पुढे  

बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन
बाजारात मिळणारा तयार आमरस घेताना जरा काळजी घ्या - अन्न व औषध प्रशासन

उन्हाळ्यात आंब्यांचा सिझन असल्यामुळे आंब्यापासून बनलेला आमरसावर सर्वच जण....

Read more