ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फेसबुकवर मोदी, प्रज्ञासिंहविरोधात पोस्ट टाकणार्‍या डॉक्टरला अटक

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 02:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फेसबुकवर मोदी, प्रज्ञासिंहविरोधात पोस्ट टाकणार्‍या डॉक्टरला अटक

शहर : मुंबई

विक्रोळीत राहणार्‍या रविंद्र तिवारी यांनी शनिवारी विक्रोळी पार्कसाइट पोलिसांकडे तक्रार दिली होती. डॉ. सुनीलकुमार निशाद हे फेसबुकवर हिंदू धर्म आणि ब्राह्मणांविरोधात पोस्ट टाकत असल्याचे तक्रारीत म्हटले होते. पोलिसांनी या आधारे गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली. अखेर बुधवारी पोलिसांनी डॉ. निशाद याला अटक केली आहे. धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला होता. अखेर निशादला मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट कॅम्पसजवळून अटक करण्यात आली, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास जाधव यांनी दिली. निशाद हा होमिओपॅथी डॉक्टर असून मुंबईतील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज देण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
रविंद्र तिवारी यांनी सांगितले की, मी आणि डॉ. निशाद एकाच परिसरात राहतो. गेल्या दोन वर्षांपासून ते सातत्याने ब्राह्मण आणि हिंदू धर्माविरोधात पोस्ट शेअर करत आहेत. मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. एखाद्या धर्माविषयी किंवा व्यक्तीविषयी तक्रार असेल तर पोलिसांची मदत घ्यावी, पण सोशल मीडियावर अशा गोष्टी पोस्ट करु नये असे त्यांना सांगितले. पण त्यांनी पोस्ट करणे सुरुच ठेवल्याने आम्ही शेवटी पोलिसांकडे तक्रार केली, असे तिवारी यांनी म्हटले आहे. डॉ. निशादच्या फेसबुक प्रोफाइलवर ‘बामसेफ’चे सदस्य असल्याचे म्हटले आहे. ‘बामसेफ’ची स्थापना बहुजन समाज पक्षाचे कांशीराम यांनी केली होती. निशादने फेसबुकवर मोदी, भाजपा आणि प्रज्ञासिंह यांच्यावर टीका करणारे पोस्ट देखील केली आहे.

मागे

तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता
तीन दहशतवाद्यांची भारतात घुसखोरी,बुद्ध पौर्णमेला मोठ्या दहशतवादी हल्यांची शक्यता

अवघ्या काही दिवसांवर येऊ घातलेल्या बुद्ध पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर भारत....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतील बारबालेचा नाद भागीदाराच्या जीवावर बेतला
मुंबईतील बारबालेचा नाद भागीदाराच्या जीवावर बेतला

बारबालेवर पैसे उडविण्यासाठी हवे असल्याने एका तरूणाने आपल्या बिझनेस पार्ट....

Read more