ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डोंबिवली अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 06, 2019 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डोंबिवली अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार

शहर : मुंबई

अश्लील व्हीडीओ दाखवून अल्पवयीन मुलावर अत्याचार झाल्याची घटना समोर येत आहे. डोंबिवलीमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 9 वर्षीय मुलाला पोर्न व्हीडीओ दाखवून एका नराधमाने त्याच्यावर लैगिंक अत्याचार केले. अखेर या नराधमाला मानपाडा पोलिसांनी जेरबंद केले आहे. सध्या शाळांना सुट्टी असल्याने मुलं घराबाहेर खेळत असतात. अशावेळी ओळखी किंवा अनोळखी नराधम पैसे किंवा चाँकलेटचे आमिश दाखवायचा प्रयत्न करुन डाव साधतात. हे प्रकार गंभीर असून यावर जरब बसण्याची गरज आहे.

डोंबिवली पूर्वेतील कोळेगाव परिसरात राहणारा 9 वर्षाचा मुलगा त्याच्या घरी होता. त्याच्या शेजारी राहणारा दिनेश लावहरी हा त्या मुलाच्या घरी नेहमी यायचा मुलाला माझा सोबत चल असे सांगितले. या मुलाने त्याच्यासोबत जाण्यास नकार दिला. मुलाचा नकाराचा राग दिनेशला आला. त्याने मुलाला मारहाण केली. मुलाला मारहाण केल्याची माहिती कळताच मुलाच्या पालकांनी मुलला विचारणा केली की दिनेश काकाने तुला का मारले. तू असे काय कृत्य केले आहे. ज्यामुळे त्याने तुला मारहाण केली. जेव्हा मुलाने आपल्या आईला वडिलांना त्याच्या सोबत झालेली घटना सांगताच पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली

काही दिवसापूर्वी दिनेश हा मुलाला घरी घेऊन गेला होता. त्यावेळी दिनेशने त्याला काही अश्लील पोर्न व्हीडीओ दाखवून त्याच्यावर लैगिंक अत्याचार केला. आणि परत तो मुलाला घरी घेऊन जाण्याच्या उद्देशाने मुलाच्या घरी आला होता ही बाब समोर येताच मुलाच्या पालकांनी या संदर्भात मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. मानपाडा पोलिसांनी नराधम दिनेश लावहरी याला अटक केली आहे.

मागे

हिमाचल प्रदेशात कार दरीत कोसळली 5 जणांचा मृत्यू 
हिमाचल प्रदेशात कार दरीत कोसळली 5 जणांचा मृत्यू 

मंडी जिल्ह्यात झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सिराजमधील भाटक....

अधिक वाचा

पुढे  

निवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं
निवडणुकीच्या काळात मुंबईत हजारो अनधिकृत बांधकामं

निवडणूक काळात मुंबईत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे फोफावल्याचं समोर आ....

Read more