ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 13, 2019 05:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

जालन्यात बनावट नोटा व्याजाने देऊन महिलांची फसवणूक

शहर : जालना

कमी व्याजदरात एक लाखांचं कर्ज काढून देतो असं सांगून 11 महिलांना गंडा घातल्याचा प्रकार जालना जिल्ह्यात घडला आहे. या प्रकरणी राजस्थानमधील एका भामट्याला गोंदी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून आठ लाख रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मुखराज राजम खान असं पकडण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. काही दिवसांपूर्वी मुखराज राजम खान हा जालना जिल्ह्यातल्या अंबड तालुक्यातील तीर्थपुरी इथं बाज विक्रीचा व्यवसाय करण्यासाठी आला होता. त्यामध्ये त्याची तीर्थपुरी इथल्या काही महिलांची ओळख झाली. तुम्हाला तिरुपती बालाजी येथून आमच्याकडे आलेला पैसा कर्जरुपाने केवळ तीन टक्के व्याजदरानं देतो. मात्र व्याजाचे पंधरा हजार रुपये आधी द्यावे लागतील असं म्हंटल्यावर गावातील काही महिला पैसे देण्यासाठी तयार झाल्या. त्यानंतर मुखराज हा काही महिलांकडून प्रत्येकी पंधरा हजार रुपये घेऊन गेला.

11 जूनला पैसे देतो म्हणून काही महिलांना त्यानं जालन्यात बोलावलं. मात्र इथं आल्यावर त्यानं बनावट नोटांचं गाठोडं या महिलांच्या हाती सोपवलं. त्यात त्याचं बिंग फुटलं आणि काही महिलांसह पुरुषांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिलं.

 

 

 

मागे

सोलापुरात वकील राजेश कांबळे यांच्या हत्येने खळबळ
सोलापुरात वकील राजेश कांबळे यांच्या हत्येने खळबळ

सोलापुरात वकिलाच्या हत्येने खळबळ माजली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे वकिलाच....

अधिक वाचा

पुढे  

स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची  प्रक्रिया सुरू
स्विस बँकेत बेकायदेशीर रित्या पैसे दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू

मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर काळापैसा समुळ नष्ट करण्याची मोहिम हाती घेतल....

Read more