ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

काही महिन्याचा पगार दिला नाही म्हणून, कंपनीच्या दोन वेबसाईट हॅक केल्या...

By PRATIMA LANDGE | प्रकाशित: एप्रिल 05, 2019 09:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

काही महिन्याचा पगार दिला नाही म्हणून, कंपनीच्या दोन वेबसाईट हॅक केल्या...

शहर : मुंबई

आधीच्या कंपनीने काही महिन्यांचा पगार थकवल्याने नोकरी सोडलेल्या एका व्यक्तीने त्या कंपनीच्या दोन वेवसाईट हॅक करून कंपनीचा बदला घेतला. या प्रकरणी मांटुगा पोलिसांनी दीपेश बुद्धभट्टी (वय २४) याला भूजमधून अटक केली आहे. त्याला मुंबईत आणण्यात आले असून त्याची चौकशी सुरू आहे. कंपनीने आपला पगार थकवल्याच्या रागातून कंपनीचा बदला घेण्याच्या हेतूने त्याने कंपनीच्या वेवसाईट हॅक केल्याचे पोलिसांनी सांगितले. दीपेश उच्चशिक्षित असून त्याच्याकडे तंत्रज्ञानाची चांगली माहिती आहे. त्यामुळे त्याने कंपनीचा बदला घेण्यासाठी त्यांच्या वेवसाईट हॅक करून कंपनीचे मोठे नुकसान केले आहे.

मुंबईतील मॅन्युफॅक्चर कंपनीच्या गुजरातच्या भुजमधील युनिटमध्ये दीपेश काम करत होता. कंपनीचे सगळे व्यवहार दोन वेबसाईटवरून होत असल्याची त्याला माहिती होती. कंपनीचे मुख्य कार्यालय मुंबईतील मांटुगामध्ये आहे. कंपनीचे व्यवहार चालणाऱ्या दोन वेबसाईट गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात हॅक झाल्या होत्या. या काळात कंपनीचे सगळे व्यवहार ठप्प झाल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. कंपनीच्या वेबसाईट पुन्हा सुरू करण्यात आल्यानंतर व्यवहार पूर्ववत होऊ लागल्यानंतर कंपनीने वेबसाईट हॅक झाल्याची तक्रार नोंदवली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली असून दीपेशला भूजमधून अटक केली.

दीपेश या कंपनीत काम करत होता. काही महिन्यांचा पगार थकल्याने त्याने नोकरी सोडली होती. कंपनीने आपले पैसे थकवल्याचा राग त्याच्या मनात होता. कंपनीचा बदला घेण्यासाठी त्याने कंपनीचे व्यवहार चालणाऱ्या दोन वेवसाईड हॅक केल्या, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करणे तांत्रिकदृष्टा खूप किचकट होते. दीपेशला तंत्रज्ञानातील चांगले ज्ञान असल्याने त्याने कोणतीही धागेदोरे मिळणार नाही अशा पद्धधतीने वेबसाईट हॅक केल्या होत्या. मात्र, पथकाने शिताफीने तपास करत या प्रकरणाचा छडा लावला. दीपेशविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागे

मी सध्या पत्नी, मुले आणि मित्रांच्या पैशांवर जगतोय- विजय माल्ल्या
मी सध्या पत्नी, मुले आणि मित्रांच्या पैशांवर जगतोय- विजय माल्ल्या

कधीकाळी ऐशोआरामाचे जीवन जगणाऱ्या व्यावसायिक विजय माल्ल्यावर उधारी मागून ....

अधिक वाचा

पुढे  

बोगस आयएफएस झोया खानला अटक
बोगस आयएफएस झोया खानला अटक

पंतप्रधान मोदींच्या मेरठ येथील रॅलीची सुरक्षा पाहणारी बोगस आयएफएस अधिकार....

Read more