ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 06, 2019 08:37 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कोपर्डीच्या निर्भयाला न्याय कधी?

शहर : मुंबई

कोपर्डीत नववीत शिकणाऱ्या मुलीवर १३ जुलै २०१६ रोजी त्यांच्याच गावातल्या तीन नराधमांनी अत्याचार केला. त्यानंतर तिची निघृण हत्या करण्यात आली. त्यावेळी कोपर्डीच्या निर्भयासाठी महाराष्ट्रात मराठा समाजाचे लाखा लाखाचे मोर्चे निघाले. मोर्चामुळे दबावात आलेल्या तत्कालीन सरकारनं आरोपींना एका वर्षात शिक्षा देऊ, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू असं सांगितलं.

फास्ट ट्रॅक कोर्टात खटला उभा राहिला. सुनावण्याही जलद झाल्या. दीड वर्षात २९ नोव्हेंबर २०१७ ला तिघाही आरोपींना फाशीची शिक्षा झाली. निर्भयाच्या कुटुंबियांना एका क्षणी वाटलं न्याय मिळाला. पण ही त्या संघर्षाची सुरुवात होती. आता खटला मुंबई हाय़कोर्टात आहे. साडेतीन वर्षानंतरही निर्भयाचे आईवडील न्यायाच्या प्रतीक्षेत आहे.हैदराबादचं एन्काऊंटर झाल्यानंतर कोपर्डीच्या त्या माऊलीनं हैदराबाद पोलिसांचं कौतुक केलं. निर्भयाच्या आरोपींनाही कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी त्या करत आहेत.

मुंबई हायकोर्टाचा निकाल येईल, तिथून प्रकरण सुप्रीम कोर्टात जाईल, तिथल्या निकालानंतर पुन्हा सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल होईल. त्यानंतर राष्ट्रपतींकडं दयेची याचिका दाखल होईल. यात सगळ्यात किती दिवस जातील हे माहिती नाही. तोपर्यंत गावोगावी रस्तोरस्ती लोकीबाळींवर अत्याचार होतच राहतील. उशीरा मिळालेल्या न्यायाला अर्थ तरी उरेल का असा सवाल विचारला जातो आहे.

मागे

हैदराबाद एन्काऊंटर :लोकांना समाधान वाटतं म्हणून समाधान व्यक्त केलं, तर…उज्ज्वल निकम
हैदराबाद एन्काऊंटर :लोकांना समाधान वाटतं म्हणून समाधान व्यक्त केलं, तर…उज्ज्वल निकम

हैदराबाद बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींचा पोलिसांनी केलेला एन्काउं....

अधिक वाचा

पुढे  

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, डॉक्टरांना अखेरची इच्छा सांगत प्राण सोडले
उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी, डॉक्टरांना अखेरची इच्छा सांगत प्राण सोडले

उन्नाव बलात्कार पीडितेची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. दिल्लीतील सफदरजंग रुग्....

Read more