ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सासू-सूनेने काही तासांच्या कालावधीतच घेतला अखेरचा श्वास

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 06:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सासू-सूनेने काही तासांच्या कालावधीतच घेतला अखेरचा श्वास

शहर : मुंबई

           वर्धा - वर्ध्यातील नखाते कुटुंबासोबत नियतीने अजब खेळ खेळला. सासूबाईंच्या निधनानंतर सूनेनेही जगाचा निरोप घेतला. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे जेमतेम महिन्याभरातच नखातेंच्या नातीचा शुभविवाह नियोजित आहे. त्यामुळे कुटुंबातील आनंदाच्या वातावरणावर दुःखाची गडद सावली पडली आहे.


         वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील कोरा गावात सासू-सूनेने काही तासांच्या कालावधीत अखेरचा श्वास घेतल्याची धक्कादायक घटना घडली. कोरा येथील पार्वतीबाई महादेव नखाते यांचं २५ डिसेंबर रात्री ११ वाजता निधन झालं. वृद्धापकाळाने त्यांनी जगाचा निरोप घेतला. सासूबाईंच्या निधनाची माहिती नातेवाईकांना देण्यात आली, त्यानुसार सर्वजण जमाही झाले. मात्र अंत्ययात्रेसाठी आलेल्या नातलगांना सूनबाईचीही अंत्ययात्रा करुन परतण्याची वेळ आली.

 

         पार्वतीबाईंच्या अंतिम संस्कार विधीची तयारी सुरु असतानाच, त्यांची सून दुर्गा हरिदास नखाते यांचीही प्राणज्योत आज सकाळी मालवली. दुर्गा यासुद्धा गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सासू पार्वताबाई आणि सून दुर्गा या दोघींची अंत्ययात्रा एकाच वेळी काढण्याची दुर्दैवी वेळ नखाते कुटुंबावर आली. एकाच वेळी सासू-सूनेला चिताग्नी देण्यात आला. नखाते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला.


         विशेष म्हणजे दुर्गा यांच्या कन्येचा विवाह समारंभ येत्या १९ जानेवारीला नियोजित आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असताना शोककळा पसरली. सासू-सूनेने एकाच वेळी जगाचा निरोप घेतल्याच्या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 

मागे

फायनान्स कंपनीला ११ कोटींचा गंडा
फायनान्स कंपनीला ११ कोटींचा गंडा

          कोल्हापूर - फ्लॅटची बनावट कागदपत्रे सादर करून दाभोळकर कॉर्न....

अधिक वाचा

पुढे  

विरारमध्ये चोरट्यांनी केली वृद्ध महिलेची हत्या
विरारमध्ये चोरट्यांनी केली वृद्ध महिलेची हत्या

       विरार - विरार पश्चिम भागातल्या विराटनगर परिसरातील ग्रीष्मा पॅल....

Read more