ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 11, 2019 01:56 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कठुआ बलात्कार आणि हत्येप्रकरणी न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

शहर : jammu

जम्मू काश्मीरच्या कठुआमधील बंजारा समाजाच्या आठ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करुन हत्या करण्यात आली होती. न्यायालयाने याप्रकरणी दोषींना शिक्षा सुनावली आहे. यातील 3 दोषींना आजीवन कारावसाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सांझीराम, दीपक खजुरिया, प्रवेश कुमारला आजीवन कारावास सुनावण्यात आली आहे. 3 आरोपींना 25 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने दोषींना दोन कलमानुसार 50-50 हजार आणि 1 लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. दीपक, सांझी आणि प्रवेश यांनाही एकएक लाखाचा दंड सुनावण्यात आला आहे. पुरावे नष्ट करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक आनंद दत्ता, हेड कॉन्स्टेबल तिलक राज आणि विशेष पोलीस अधिकारी सुरेंदर वर्माला 5 वर्षांची कैद सुनावण्यात आली.

पठाणकोटच्या स्पेशल कोर्टाने सातमधील सात दोषींपैकी 6 आरोपींना दोषी ठरवले होते. गेल्यावर्षी १० जानेवारीला पीडित मुलीचे अपहरण करण्यात आले होते. यानंतर तिला गावातील मंदिरात बेशुद्ध करून डांबून ठेवण्यात आले होते. या काळात नराधम आरोपींनी तिच्यावर अत्याचार केले. यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. हे प्रकरण समोर आल्यानंतर देशभरात संतापाची मोठी लाट उसळली होती. देशभर निषेध मोर्चे काढण्यात आले होते. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी सांजी राम याने परिसरातून मुसलमानांना हुसकावून लावण्यासाठी हे कृत्य केल्याचेही तपासात समोर आले होते. सांजी राम हा बकरवाल आणि हिंदूमध्ये समेट घडवण्याच्या विरोधात होता. तो नेहमी बकरवालांना जनावरे चरण्यासाठी जमीन देण्यात येऊ नये यासाठी हिंदुंना भडकावत असे. त्यानेच या अमानवी कृत्यासाठी इतरांना भडकावले होते.

पोलिसांनी दाखल केलेल्या १५ पानी आरोपपत्रात या प्रकरणाने जम्मू-काश्मीरमध्ये जातीय तेढ निर्माण झाल्याचे म्हटले होते. मारेकऱ्यांना वाचवण्यासाठी जम्मूमध्ये आंदोलने सुरू आहेत, तर आरोपींना कडक शिक्षा व्हावी, यासाठी श्रीनगरमध्ये निदर्शने करण्यात आली होती.

मागे

नाशिकमध्ये पोलीस अधीक्षकांच्या घरातच चोरी
नाशिकमध्ये पोलीस अधीक्षकांच्या घरातच चोरी

नाशिक शहरात गेल्या दोन महिन्यापासून चोऱ्यांचे सत्र सुरु आहे. पोलिसांना चोर....

अधिक वाचा

पुढे  

मॅच पाहण्यासाठी आलेल्या मल्ल्याविरोधात 'चोर-चोर'च्या घोषणा
मॅच पाहण्यासाठी आलेल्या मल्ल्याविरोधात 'चोर-चोर'च्या घोषणा

भारतीय बँकांना फसवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय मल्ल्याविरोधात भारतीया....

Read more