ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 01, 2019 10:38 AM 2019-02-12T14:15:30+5:30

डॉ. पायल आत्महत्या प्रकरणी आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी

शहर : मुंबई

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी सत्र न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी तिन्ही आरोपींना १० जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. गुन्हे शाखेकडे नुकताच तपास दिला असला तरी ठोस पूरावे शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. डॉ. पायल तडवी प्रकरणात सहकारी स्नेहल शिंदेची साक्ष झाली. पायलला जातीवाचक शब्दवापरुन अपमानीत केल्याचे बोलले जात आहे. पायलच्या सहकारीचा जबाब घेण्यात आला आहे. नायर रुग्णालयातील प्राध्यापक वर्गाचीही होणार चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांच्या लेखी चौकशी अहवालात अनेक बाबी समोर येणार आहेत

सत्र न्यायालयात पार पडलेल्या सुनावणीत क्राईम ब्रांचने सखोल चौकशीसाठी सात दिवसांचा अवधी मागितला. यामध्ये रुग्णालयातील कर्मचारी वर्ग, शिपायी यांची चौकशी होऊ शकते. कारण पोलिसांना पायलची आई,सहकारी यांनी दिलेल्या जाबाबीत नायर रुग्णालयात काम करणा-या कर्मचारी वर्गाचा उल्लेख आहे. सञ न्यायालयात पोलिसांनी आत्तापर्यंत हाती आलेल्या चौकशीतील बाबी न्यायालयात सादर केल्या.

 डॉ. पायल तडवी याची सहकारी स्नेहल शिंदेने साक्ष दिली असून यात तिने, तिच्यासमोर पायल हिला अटक आरोपींकडून किरकोळ कारणावरुन जातीवाचक शब्द वापरुन अपमानीत केले असल्याचे सांगितले. स्नेहल शिंदे हिने सविस्तर जबाब पोलिसांना दिला आहे. त्यानुसार त्यादिशेन पोलीस तपास जाण्याची शक्यता आहे.

                                         

मागे

रस्त्यावर इडली सांभार खाताय, तर सावधान ! पाहा हा व्हिडिओ
रस्त्यावर इडली सांभार खाताय, तर सावधान ! पाहा हा व्हिडिओ

कुर्ल्याच्या अस्वच्छ लिंबू सरबत वाल्यानंतर पुन्हा एकदा रस्त्यावर खाद्यपद....

अधिक वाचा

पुढे  

रॉबर्ट वाड्रा यांना झटका, लंडनला जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली
रॉबर्ट वाड्रा यांना झटका, लंडनला जाण्याची परवानगी कोर्टाने नाकारली

मनी लाँड्रिंग प्रकरणात काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांचे पती आणि ....

Read more