ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजारांना, पाच जणांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 23, 2020 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार, 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजारांना, पाच जणांना अटक

शहर : मुंबई

कोरोनावर प्रभावी मानले जाणारे रेमडेसीवीर इंजेक्शनचा काळा बाजार (Remdesivir Injection Black Market Racket) करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. 3 हजाराचे इंजेक्शन 25 हजार रुपयांना तर अन्य एक इंजेक्शन तब्बल 80 हजार रुपये किमतीत ही टोळी विकत होती.

देशात आणि महाराष्ट्रात कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव आणि मृत पावलेल्या लोकांची संख्या यामुळे कोव्हिडवर परिणामकारक ठरलेल्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शन रक्षक ठरलेली आहेत. मात्र, त्याचा बाजारात तुटवडा आहे. दरम्यान, या इंजेक्शनचा काळाबाजार करुन 25 हजार आणि 80 हजार रुपयांचे इंजेक्शन विक्री करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक करुन रॅकेट उध्वस्त केले. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात जीवांरक्षक औषधांचा काळाबाजार, अतिरिक्त पैसे घेणे प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे न्यायालयाने 26 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी ठाणे गुन्हे शाखा खंडणी विरोधी पथक अधिक तपास करत आहेत.

सध्या कोरोनावर परिणामकारक असलेली औषधं बाजारात कमी आहेत. त्यामुळे तुटवडा जाणवणाऱ्या Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनच्या मूळ किमतीपेक्षा जास्त पैसे उकळण्याचा धंदा सध्या तेजीत आहे.

तक्रारदारानुसार, 21 जुलै 2020 रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास ठाणे खंडणी विरोधी पथकाला वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाची खातरजमा करीत संभावित तीन पेट्रोल पंप, नौपाडा भागात सापळा रचला. पोलीस पथकाने जीवांरक्षक इंजेक्शनसह तिघांना अटक केली. त्यांच्या अधिक चौकशीत औषधे पुरविणारे दोन आरोपी हे नवी मुंबई कामोठे येथे असल्याचे समजताच त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.

अरुण रामजी सिंग, सुधाकर शोभीत गिरी, रविंद्र मोहन शिंदे, वसीम अहमद अब्दुल अहमद शेख, अमिताब निर्मल दास असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनसह कँसर, गर्भपात आदींची औषधं आणि हुंडाई एसेंट कार असा 5 लाख 18 हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. ही टोळी Remdesivir आणि Tocilizumab ही दोन इंजेक्शनचा काळ्याबाजारात 25 हजार आणि 80 हजार रुपये घेत होते.तर दुसरीकडे, आतापर्यंत मीरा रोड, मुलुंड आणि ठाण्यात अशा प्रकारे 3 कारवाई अन्न आणि औषध प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आलेली आहे. अशाप्रकारे काळा बाजार करुन इंजेक्शन विकणाऱ्या विरोधात नागरिकांनी देखील समोर यावे, असे आव्हान अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केले आहे. तसेच, यामागे बड्या रुग्णालय आणि मेडिकलशी निगडित कोणाचा हात आहे का, याचा देखील तपस करीत असल्याचे अन्न आणि औषध प्रशासन विभागाने सांगितले आहे.

अशाप्रकारे काळा बाजार करणाऱ्या टोळीचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट वाढला असून याबाबत कोव्हिड रुग्णांसाठी लागणारे औषध आणि इंजेक्शनबाबत विचारपूस केली असता चढ्या भावाने विकणाऱ्या टोळीशी संपर्क करुन त्यांच्याबाबत ठाणे पोलीस आणि अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत छडा लावण्याचे काम तक्रारदार बनून वर्गीस यांच्या मार्फत पुढे आले आहे. मागे देखील मीरा रोड येथे अशाच प्रकारे टोळीचा पर्दा फाश करण्याचे काम वर्गीस यांनी केले आहे.

 

मागे

भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू
भाचीच्या छेडछाडीची तक्रार दिल्याचा राग, मुलींसमोर गुंडांचा गोळीबार, पत्रकाराचा मृत्यू

गुंडांच्या गोळीबारात गंभीर जखमी झालेले गाझियाबादमधील पत्रकार विक्रम जोशी....

अधिक वाचा

पुढे  

आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक
आमदाराच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप व्हायरल, भाजप पदाधिकारी महिलेला अटक

मिरा भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन यांच्या आवाजातील नकली ऑडिओ क्लिप सोशल....

Read more