ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 25, 2019 08:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी संजीव पुनाळेकरांना अटक

शहर : पुणे

नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयनं संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या दोघांना अटक केली आहे. सीबीआयने मुंबईमध्ये ही कारवाई केली आहे. संजीव पुनाळेकर हे सनातन संस्थेचे वकील आहेत. शिवाय अनेक प्रकरणात अटकेतल्या हिंदुत्ववाद्यांचे वकील आहेत. पुनाळेकरांसोबत विक्रम भावेलाही अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही मुंबईतून अटक केल्याचं सांगण्यात येतंय. या प्रकरणात अगोदरच अटकेत असलेल्या शरद कळसकरच्या माहितीवरून ही अटक केल्याचं सांगण्यात येतं आहे. हत्येचा कट आणि पुरावे नष्ट करण्याचा आरोप पुनाळेकर आणि भावे यांच्यावर आहे. 

नरेंद्र दाभोलकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यात हत्या करण्यात आली होती. सीबीआयने हे पाऊल उशीरा उचललं असलं तरी त्याचं आम्ही स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया अनिंसकडून देण्यात आली आहे. यामुळे नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येच्या सूत्रधारांपर्यंत सीबीआय पोहोचेल, अशी अपेक्षा अनिंसने व्यक्त केली आहे. 

दरम्यान संजीव पुनाळेकर यांना अटक करणं हे षडयंत्र आहे, असा आरोप सनातन संस्थेचे प्रवक्ते चेतन राजहंस यांनी केला आहे. पुरोगाम्यांच्या मागणीपुढे सीबीआय झुकली आहे, असं चेतन राजहंस म्हणाले.   

मागे

विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण
विमान ऑटो पायलट मोडवर ठेवून १५ वर्षीय मुलीचे केले लैंगिक शोषण

विमान ऑटो पायलट मोडवर टाकून अल्ववयीन मुलीसोबत शरीरसंबंध ठेवल्याप्रकरणी अ....

अधिक वाचा

पुढे  

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या
पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजप कार्यकर्त्याची हत्या

पश्चिम बंगालमध्ये आणखी एका भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. रविवारी रा....

Read more