ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

श्रीलंकेत आणखी एक स्फोट; बस स्थानकात ८७ बॉम्ब डिटोनेटर्स सापडले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 22, 2019 06:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रीलंकेत आणखी एक स्फोट; बस स्थानकात ८७ बॉम्ब डिटोनेटर्स सापडले

शहर : विदेश

बॉम्बस्फोटाच्या मालिकेमुळे हादरलेल्या श्रीलंकेतील दहशत अजूनही कायम आहे. आज सलग दुसऱ्या दिवशी कोलंबो येथील चर्चच्या परिसरामध्ये स्फोट झाला. येथील एका गाडीमध्ये हा बॉम्ब ठेवण्यात आला होता. पोलिसांना याबद्दल माहिती मिळाल्यानंतर याठिकाणी बॉम्बशोधक पथकाला पाचारण करण्यात आले. मात्र, बॉम्ब निकामी करत असताना त्याचा स्फोट झाला, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कालच्या स्फोटांच्या मालिकेनंतर श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाल सिरीसेना यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली.

दरम्यान आज सकाळपासून कोलंबोमध्ये पोलिसांकडून जोरदार शोधमोहीम हाती घेण्यात आली. यावेळी पोलिसांना कोलंबो शहरातील मुख्य बस स्थानकाच्या परिसरात तब्बल ८७ बॉम्ब डिटोनेटर्स सापडले. त्यामुळे कोलंबोत आणखी मोठा घातपात घडवण्याचा इरादा समोर आला आहे.कोलंबो शहर रविवारी आठ बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. चार आलिशान हॉटेल आणि दोन चर्चमध्ये घडवण्यात आलेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात २९० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ५०० हून अधिक जण जखमी झाले आहेत.

लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलमच्या संघटनेचा बीमोड केल्यानंतर गेल्या दहा वर्षात श्रीलंकेतील दहशतवाद संपुष्टात आला होता. मात्र, कालच्या बॉम्बस्फोटांच्या मालिकेनंतर श्रीलंका हादरली आहे. या स्फोटांची चौकशी करण्यासाठी राष्ट्राध्यक्षांकडून तीन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. येत्या दोन आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करेल. तसेच श्रीलंकेकडून या स्फोटांचा छडा लावण्यासाठी अन्य देशांची मदतही घेण्यात येणार आहे.

 

मागे

Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी
Sri Lanka bomb blasts : साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत आज मध्यरात्रीपासून आणीबाणी

रविवारी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटामुळे श्रीलंकेमध्ये भीती आणि दहशतीचे वा....

अधिक वाचा

पुढे  

न्यूझीलंडच्या मशिदींवरील हल्ल्याचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत बॉम्बस्फोट?
न्यूझीलंडच्या मशिदींवरील हल्ल्याचा सूड घेण्यासाठी श्रीलंकेत बॉम्बस्फोट?

काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडच्या ख्राईस्टचर्च येथील मशिदींमध्ये झालेल्य....

Read more