ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

चंद्रपूरमधील काँग्रेस नेत्याचे आदिवासी बलात्कार पीडित मुलींबाबत बेताल वक्तव्य, नागरिकांमध्ये संतापाच

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 24, 2019 01:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चंद्रपूरमधील काँग्रेस नेत्याचे आदिवासी बलात्कार पीडित मुलींबाबत बेताल वक्तव्य, नागरिकांमध्ये संतापाच

शहर : चंद्रपूर

चंद्रपूरमध्ये काँग्रेस नेत्याने बलात्कार पीडित मुलींबाबत बेताल वक्तव्या प्रकरणी सामाजिक स्तरातून तीव्र निषेध केला जात आहे. बेलगाम वक्तव्यामुळे आदिवासी समाज विशेष नाराज झाला असून आदिवासी समाजाच्या महिलांनी संघटीत होऊन या नेत्यांचा जाहीर निषेध केला आहे. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी ‘पॉस्कोअंतर्गत सरकारकडून मिळणार्‍या पैशांसाठी आदिवासी मुली बलात्कार झाल्याची तक्रार देण्यासाठी पुढे येतात’ असे बेलगाम वक्तव्य केले आहे. त्यामुळे आदिवासी समाजात संतापाची लाट पसरली आहे. पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला तर सरकारकडून पैसे मिळतात. असे असल्याने आदिवासी मुली अत्याचार झाल्याची तक्रार देण्यासाठी मोठ्या प्रमाणात पुढे येत आहेत, असे हीन दर्जाचे आणि संतापजनक वक्तव्य काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार आणि जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांनी आदिवासी समाजाच्या बलात्कार पीडित मुलींबाबत केले होते. याबाबत भाजपने या काँग्रेस नेत्यांवर एट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करण्यासाठी तक्रार दाखल केली आहे.

मागे

श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं
श्रीलंका पुन्हा एकदा स्फोटानं हादरलं, मोटारसायकलवर आढळली स्फोटकं

कोलंबोमध्ये सिवोय सिनेमाजवळ बुधवारी सकाळी आणखी एक स्फोट झालाय. मिळालेल्या ....

अधिक वाचा

पुढे  

अशाप्रकारे मालमत्ता जप्त करणे माझ्यासाठी आर्थिक मृत्यूदंड - विजय मल्ल्या
अशाप्रकारे मालमत्ता जप्त करणे माझ्यासाठी आर्थिक मृत्यूदंड - विजय मल्ल्या

भारतीय बँकांचे तब्बल नऊ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला....

Read more