ठळक बातम्या शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठी पिंपळवृक्षाखाली दिवा लावा!.    |     सूर्य देव कुंभात प्रवेश करेल, या राशींसाठी धन लाभाचे योग.    |     Magh Maas : पुण्य कमविण्यासाठी माघ महिन्याचे महत्त्व जाणून घ्या.    |     १०वी उत्तीर्णांसाठी संधी : लष्करात मेगा भरती.    |     पालकांनो इकडे लक्ष द्या, मुलांसाठी सॅनिटायझरचा वापर करताय !.    |    

श्रमदानाचा अनुभव

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: मे 17, 2019 02:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

श्रमदानाचा अनुभव

शहर : मुंबई

एप्रिल महिन्यात बाबाने मला विचारले की महाराष्ट्र दिनाच्या दिवशी कुठे तरी फिरायला जायचं का?? मी होकार नोंदवला. नंतर मला कळलं की बाबा मला अंबेजोगाई ला पाणलोट विकासाच्या कामासाठी घेऊन चाललाय. मी नाराज झालो. मला वाटले की खूप कंटाळा येईल, ऊन असेल, गरम होईल; माझी नकारघंटा सुरू झाली.पण कंटाळा येईल हा माझा गैर समाज होता.

रात्री कल्याण हून आम्ही बीदर एक्स्प्रेस मध्ये बसलो, सकाळी लातूर ल पोहोचलो. आमचा ११ जणांचा ग्रुप होता. सगळ्यांनी आपापला परिचय केला. लातूर मधून एस्टी पकडली आणि अंबेजोगाई ल पोहोचलो. प्रसाद दादा आम्हाला दोन गाड्या घेऊन न्यायला आला होता. दादा आम्हाला श्रमदनाचा स्थळी घेऊन गेला. आम्ही बंसरोले गवत पोहोचलो. तिथे जितेंद्र जोशी गावकऱ्यांना मदत करायला आला होता. आम्हाला पोहोचे पर्यंत ९ वाजलेले, तेव्हा जितेंद्र जोशी चे भाषण चालू होते. मी थेट श्रमदानाला सुरुवात केली. गावातील तरुण मुलं बांध बांधत होती. मी एक फवडा उचलला आणि काम सुरू केले.

सगळे गावकरी एकजुटीने काम करताना पाहून अंगामध्ये एक वेगळाच जोश आला. एवढी कुदळ फवडी मारून पण थकवा जाणवत नव्हता.ही सगळी औजारे पहिल्यांदाच हातात घेतली होती, तो अनुभव वेगळाच होता. पाणी हा जीवनातील एक अविभाज्य घटक आहे, ते मिळवण्यासाठी साठी दुष्काळग्रस्त किती मेहनत घेतात हे मी त्या दिवशी बघितला. गावात दोन हजार लोक जमले होते. जर माणसं एका ध्येयाने एकत्र आली तर अ' शक्य' मधला 'अ' खोडणे सोपे जाते याचे मी उदाहरण पाहिले. 

तिथून आम्ही द्यानप्रबोधिनी चा अंबेजोगाई केंद्रावर गेलो जिथे आमची रात्री राहायची सोय होती. दुपारी जेवलो व  केंद्रावर आराम केला. माझ्या मनात विचार येत होता, इथे लोकं पाण्यासाठी एवढी धडपड करतात आणि एकीकडे आपण जे खूप पाणी असच वाया घालवतो. तिथे ऊन खूप होते, त्यामुळे सन स्ट्रोक ची भीती होती. ते होऊ नये म्हणून सकाळी ६ ते ११ व संध्याकाळी ६ ते १० काम चालायचं, दुपारी सगळे विश्रांती घायचे.

संध्याकाळी आम्ही दादाचा माती प्रकल्प बघायला विवेकवाडी ल गेलो. विवेकवाडी एक टेकडी वरची जागा होती जी द्यानप्रबोधिनी ने २००२ मध्ये विकत घेऊन तिथे माती प्रकल्प सुरू केला होता. अनेक झाडे लावली होती, पाण्यासाठी कॅनल बांधले होते. इथल्या मातीवर अनेक प्रयोग करून कशाने जास्तीत - जास्त  चांगले पीक मिळेल  याचा शोध करायचे. माती मधील शेंद्रिय कर्ब म्हणजे काय व त्याचा उपयोग काय, त्याचे मतीमदील प्रमाण कसे वाढवायचे ते सांगितले. रात्री आम्ही केंद्रावर परतलो . दिवसा काम करून छान झोप लागली पण अजून मनसोक्त श्रमदान केले नव्हते. 

दुसऱ्या दिवशी सगळे लवकर उठले आणि आम्ही               गावाकडे निघालो. ८ च्या सुमारास तिथे पोहचलो. पाणलोट विकासाच काम अगदी जोरात चालू होते. आम्ही काम सुरू केलं. शहरातील लोकं आपल्या गावात आपली मदत करायला आली आहेत हे पाहून गावकऱ्यांना अधिक आनंद झाला. सगळे जलमित्र कामात जुंपले होते; कोणी माती खणत होता तर कोणी मातीने भरलेली घमेली बांधावर रिकामे करत. तिथली चिमुकली मुलं सुद्धा आपला खारीचा वाटा द्यायला आली होती. सगळ्यांना काम करताना पाहून एक्साइटमेंट निर्माण झाली व मी माती उपसणं चालू ठेवलं. 

सगळ्यांनी आज मनापासून श्रमदान केले होते. गावकऱ्यांनी आमची ट्रॅक्टर व बैलगाडीत बसण्याची हौस पण पूर्ण केली.  गावातील युवकांनी त्या दिवशी नाश्त्याची सोय केली होती. त्यांनी आम्हाला हात धरून खायला बसवलं. जिलेबी व पोह्यांवर आम्ही ताव मारला. त्यानंतर आम्ही मुळ गावात म्हणजे वस्तीवर आलो. तिथे मातीमधील शेंद्रिय कार्बन चे प्रमाण कसे मोजायचे याचे प्रशिक्षण देणार होते. ते पाहून आम्ही केंद्रावर परतलो. प्रसाद दादाने आपापला श्रमदानाचा अनुभव व्यक्त करायला सांगितला. त्यावर आम्ही आमचे अनुभव सांगितले. दुपारी आम्ही डोस्यांवर ताव मारला व आराम केला. आम्हाला रात्री १०:२५ च्या बीदर एक्स्प्रेस ने परतायचे होते, म्हणून संध्याकाळी कोणत्याही गावात जाऊ शकलो नाही. ७ ची लातूर एस्टी आम्ही अंबेजोगाई बस स्थानकावर पकडली. ८:४५ च्या सुमारास लातूरला पोहोचलो. एका हॉटेल मध्ये जेवण केले, १०:०० वाजता आम्ही लातूर रेल्वे स्टेशन ला आलो.१०:३० ल गाडीत चढलो.

 अचानक एका क्षणभरात  दोन दिवसात जे काय केलं ते सगळं आठवायला लागलं. आयुष्यात असा अनुभव पहिल्यांदाच घेतला होता. माझं मत आहे की प्रत्येकाने आपल्या जीवनात असा एखादा अनुभव नक्की घ्यावा. ते दोन दिवस घरी टीव्ही बघण्यापेक्षा मी जगाची एक वेगळी बाजू अनुभवली. तेव्हाच मी निश्चय केला की मी दर वर्षी किमान दोन दिवस तरी पाणलोट विकासाच्या कामामध्ये प्रसाद दादा ची मदत करायला यायचंच.

मागे

लोकशाहीचा उत्सव
लोकशाहीचा उत्सव

देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक ठिकाणी सध्या फक्त निवडणुकीचीच चर्चा आहे.....

अधिक वाचा

पुढे  

शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे?
शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे?

शाळा निवडतांना कुठले बोर्ड घ्यावे? पालक शाळा निवडतांना, “बोर्ड कुठ....

Read more