ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आत्मज्ञान

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 07, 2019 01:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आत्मज्ञान

शहर : नाशिक

संसार प्रपंचात, शाळा महाविद्यालयात शिकलेल्या माणसाला ज्ञानी म्हणतात. अशिक्षित माणसाला अडाणी म्हटले जाते.  परंतु परमार्थात ज्याला‘आत्मज्ञान’ झाले. आहे त्यास ज्ञानी समजतात. बाकीचे तसेच अज्ञानी-विचार नसतो. त्यांच्यात अहंकार माणसांना विवेक नसतो. कोणताही ठाम आचार-विचार नसतो. त्यांच्यात अहंकार असतो. हा अहंकार काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, या पड्रिपूंवर पोसला जातो. याचेच कमी अधिक प्रतिबिंब त्यांच्या आचार-विचारात उतरले. त्याचा अनेकदा अनुभव येतो. यास आळा घालण्यासाठी सारासार विचार आणि सदसदविवेक बुध्दीची गरज असते. हे सारे डोळस उपासनेतून आणि सकारात्मक व्रतस्थ वृत्तीतून येत असते. प्रसंगी ते प्रयत्नपूर्वक साध्य करून घ्यावे लागते.यासाठी मनन, चिंतन,  निरीक्षण, परीक्षण या दिशेने अभ्यास करावा लागतो. आजपर्यंत अनेक साधुसंत, सत्पुरूष, महात्मे सदाचार-विचार व्यवहाराबद्दल सांगत आलेले आहेत. आपण त्यांचे ऐकतो. वाचतो. सुध्दा पण आपल्या चित्तात वा वृत्तीत किती रूजवतो, मुरवतो? खरे तर डोळे उघडे ठेवून, एकाग्र चित्त करून मनोमन ठरविले तर आपणच आपल्या आचार विचार व्यवहारात सकारात्मक बदल करू शकतो. फक्त त्यासाठी निश्चत महत्त्वाचा आहे. अन्यथा ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे.’ या संत रामदास्वामींच्या उक्तीप्रमाणे होते. सद्यःस्थितीत स्पर्धात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी व नित्याच्या व्यवहारासाठी शाळा, महाविद्यालयात जाऊन शिकावे लागते. सुशिक्षित व्हावे लागते. हे खरे आहे. पण जीवनात खरी खुरी आत्मिक समृध्दता, संपन्नता आणण्यासाठी परमार्थातील आत्मज्ञान अल्पस्वल्प प्रमाणात का होईना  आवश्यक असते, ते ज्ञान जीवनाता हेतू, उद्देश इत्यादी संकल्पना अधिक सुस्पष्ट करणारे असते. परमार्थातील चिरंतन मूल्य आणि वास्तव जीवनातील मूल्ये यांची सांगड घालून वास्तवाचे भान ठेवून जगणेच अंतिमतः चिरंतन सुख-समाधान मिळवून देणारे आहे. हे ज्या व्यक्तीत आहे. ती व्यक्तीच खरी-खुरी आत्मज्ञानी असते. असे हे आत्मज्ञानी होणे ज्या त्या व्यक्तीवर अवलंबून असते.

मागे

महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक  जोतिबा फुले
महाराष्ट्रातील आद्य समाज सुधारक  जोतिबा फुले

अठराव्या शतकातील दिन दलित आणि स्त्रियांना योग्य शिक्षण आणि समानतेचा हक्क म....

अधिक वाचा

पुढे  

लोकशाहीचा उत्सव
लोकशाहीचा उत्सव

देशाच्या कानाकोपर्‍यात प्रत्येक ठिकाणी सध्या फक्त निवडणुकीचीच चर्चा आहे.....

Read more