ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जून 06, 2019 06:58 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर

शहर : मुंबई

पुर्ण नाव:

सचिन रमेश तेंडुलकर

जन्म:

24 एप्रील 1973

जन्मस्थान:

मुंबई

वडिल:

रमेश तेंडुलकर

आई:

रजनी तेंडुलकर

विवाह (Wife) :

अंजली तेंडुलकर

 

सामान्य कुटुंबात लहानाचा मोठ्या झालेल्या सचिनने आपले शिक्षण मुंबईतील शारदाश्रमात पुर्ण केले. अजित या मोठया भावाने लहानपणीच सचिन मधील क्रिकेटची आवड पाहाता त्याला योग्य मार्गदर्शन दिले. क्रिकेट मधील द्रोणाचार्यरमाकांत आचरेकर सरांनी सचिन ला क्रिकेट मधे सक्षम बनविले. हॅरिस पदकाकरीता झालेल्या स्पर्धेत 326 धावा काढत विनोद कांबळी समवेत 664 धावांची विक्रमी भागिदारी करण्याचा पराक्रम केला आणि वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षी सचिन भारतिय संघात सहभागी झाला.

1990 साली इंग्लंड दो.या दरम्यान सचिन ने कसोटी कारकिर्दीतील पहिले शतक (नाबाद 119) झळकविले. त्यानंतर ऑस्ट्रेलिया, दक्षिण अफ्रिकेतील दौ.या दरम्यान शतकांची ही श्रृंखला सुरू राहिली. सचिनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 21 सामने विदेशात खेळले. 1992 – 93 या वर्षी इंग्लंड विरूध्द खेळल्या गेलेला सामना भारतातील सचिनचा पहिला सामना होता.

महत्वपुर्ण घटना सांगायची झाल्यास शारजा येथे कोका कोला विश्वचषक एकदिवसीय सामन्याच्या उपांत्य फेरीत व शेवटच्या सामन्यात सचिन ने सदैव स्मरणात राहील अशी कामगिरीकेली आणि संपुर्ण जग त्याच्याकडे चमत्काराच्यादृष्टीने पाहु लागले. त्याची ही कामगिरी डेझर्ट स्टॉर्म’ (वाळवंटातील वादळ) म्हणुन प्रसिध्द झाली. त्याच्या दोन दिवसानंतर ऑस्ट्रेलिया विरूध्द अखेरच्या सामन्यात सचिनने पुन्हा एकदा 131 चेंडुत 134 धावा काढुन भारताच्या गळयात विजयाची माळ घातली. या सामन्यानंतर ‘Cricket international’ या पत्रिकेने देखील दुसरा ब्रॅडमनम्हणुन सचिनचा गौरव केला.

 2005 – 06 दरम्यान टेनिस एल्बोआणि खांद्याच्या दुखापतीमुळे सचिन चिंतीत होता. तरी देखील आपल्या खेळात थोडा बदल करून त्याने प्रदर्शनात सातत्य राखले. क्रिकेट इतिहासात जागतिक पातळीवर सचिनचे सर्वाधिक 39 शतकं, 4 दुहेरी शतकं यांचा समावेश आणि नाबाद 248 ही सर्वोच्च धावसंख्या आहे. एकदिवसीय सामन्यांमधे सचिनने सर्वाधिक म्हणजे 42 शतकं झळकविले असुन एकुण 89 अर्धशतकांची त्याच्या नावावर नोंद आहे. खेळातील प्रदर्शनामुळे आणि व्यक्तिमत्वामुळे जगभरातुन प्रेम आणि आदर मिळविण्यात मात्र यश प्राप्त केलं. महान कर्तुत्व असुन देखील कधीही वागण्यात अहंकार न आणता कायम संवेदनशील राहाणारा सचिन सर्व जगासमोर एक आदर्श ठरला. आज संपुर्ण जगात लहानांपासुन तर मोठयांपर्यंत प्रत्येकाच्या ओठांवर क्रिकेटचा दुसरा अर्थ सचिन तेंडुलकर हाच आहे.

सचिन तेंडुलकर चे विक्रम

1. मीरपुर इथं बांग्लादेश विरूध्द 100 वे शतक पुर्ण केले.

2. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या इतिहासात दुहेरी शतक करणारा पहिला खेळाडु ठरला.

3. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त (18000 पेक्षा अधिक) धावा काढल्या.

4. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधे सर्वात जास्त 49 शतक बनविले.

5. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा.

6. सचिन तेंडुलकर ने कसोटी क्रिकेट मधे सर्वात जास्त (51) शतक बनविले आहेत.

7. ऑस्ट्रेलिया विरूध्द 5 नोव्हेंबर 2009 ला 175 धावा काढत एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधे 17000 धावा पुर्ण करणारा पहिला फलंदाज ठरला.

8. कसोटी क्रिकेट मधे सर्वाधिक धावा काढणारा खेळाडु.

9. कसोटी क्रिकेट मध्ये 13000 धावा काढणारा जगातील पहिला फलंदाज.

10. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मालिकावीर.

11. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक वेळा मॅन आॅफ द मॅच.

12. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सर्वाधिक 30000 धावा काढण्याचा किर्तीमान सचिनच्या नावे आहे.

राष्ट्रीय सन्मान

1994 – अर्जुन पुरस्कार: खेळातील उत्कृष्ट कामगिरी करीता भारत सरकारव्दारे

1997 – 98 – राजीव गांधी खेल रत्न: क्रिकेट मधील कामगिरी करीता भारताव्दारे मिळालेला सर्वोच्च सन्मान

1999 – पद्मश्री: भारताचा चैथा सर्वोच्च नागरीक पुरस्कार

2001 – महाराष्ट्र भुषण पुरस्कार: महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार

2008 – पद्मविभुषण: भारताचा दुसरा सर्वोच्च नागरीक पुरस्कार

2014 – भारतरत्न: भारताचा सर्वोच्च नागरीक पुरस्कार (भारतरत्न मिळालेला सर्वात कमी वयाचा व्यक्ती)

 

मागे

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज यांची महिती नाव (Name) शिवाजी शहाजी भोसले (shiva....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार
मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार

मुंबई महापालिकेचा भोंगळ कारभार यंदाही मुंबईकरांना पाण्यात बुडवणार यात का....

Read more