ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वडाच्या पारावर : याला न्याय म्हणावं का?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 09, 2019 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

वडाच्या पारावर : याला न्याय म्हणावं का?

शहर : मुंबई

मन्या-: पोलिसांनी मनावर घेतलं तर लगेच गुन्हेगाराला अद्दल घडवू शकतात.

संत्या -: कशावरून तू हे म्हणतोस.

गण्या -: पोलीस न्याय द्यायला लागले तर कायद्याची गरज उरणार काय.

मन्या -: काय ते कळल असं बोला की राव.

मन्या -: हैदमान्यबाद मध्ये पोलिसांनी आरोपींचा एनकाउंटर केला.

संत्या -: कसले आरोपी? त्यांनी काय केलं व्हतं?

गण्या -:अगदीच इसरभोळा कसा तू ?

मन्या -: गेल्या हफ्त्यात हैदराबाद मध्ये चार नराधमांनी डॉक्टरणीवर बलात्कार करून तिला जाळलं व्हतं.

गण्या -: या घटनेनं देशभर खळबळ उडाली. आरोपींना ठेचून मारण्याची मागणी होऊ लागली.

संत्या -: हां, हां..ती घटना, आठवली बग. सर्वांनीच त्यावर संताप व्यक्त केला व्हता.

मन्या -: आरोपींना लवकरात लवकर फासावर लटकवण्याची मागणी करण्यात येत व्हती.

गण्या -: अशाप्रकारचे मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदे करण्याची गरज असल्याचे म्हंटल जातंय.

संत्या -: मागं दिल्लीत निर्भया बलात्कार हत्याकांड प्रकरणातही अशीच देशभर संतापाची लाट उसळली व्हती.

गण्या -: तवा बी सुधारणा करून कायद्यात कठोर शिक्षेची तरतूद केली गेली.

मन्या -: पण अजूनही त्या परकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाय.

संत्या -: शिवाय बलात्काराची परकरणं थांबलेली नायत.

गण्या -: उलट ही विकृत प्रवृत्ती वाढत चालली आहे.

संत्या -: लहान-लहान पोरीबाळींसह अगदी ७० वरसाची आजीदेखील या नराधमांच्या हातून सुटत न्हाय.

मन्या -: अशी वाईट कृत्य करणाऱ्यांना धाक राहिलेला न्हाय.

संत्या -: आरं धाक राहाणार कसा? गुन्हेगारावर वर्षानुवर्षे खटला चालतो शेवटी. आरोपी दयेचा अर्ज करतो. त्यावर पण झटपट निर्णय व्हतं नाय.

गण्या -: म्हणजे व्यायला ईलंब व्हतो. बऱ्याच येळेला गुन्हेगाराला पाठीशी घातलं जातं. कायद्यातून पळवाटा शोधल्या जातात.

मन्या -: म्हणूनच लोकांचा कायद्यावरचा, न्यायालयावरचा इश्वास उडत चाललाय.

गण्या -: म्हणूनच हैदराबाद पोलिसांनी नराधमांचा एनकाउंटर केल्यावर अरब बाप बापड्यांनी समाधान व्यक्त केलंय.

मन्या -: होय, पर काही जणांना पोलिसांनी कायदा हातात घेऊ नये, असं वाटतंय

संत्या -: म्हंजे पोलिसांनी त्यांचं काम करावं, शिक्षा देण्याचं काम न्यायालय करील.

गण्या -: व्यय, बराबर हाय. पर न्यायचं काम त्यासाठी जलद गतीनं व्हायला हवंय.

मन्या -: यावर नामांकित वकील उज्वल निकम यांचं मत लक्षात घ्यायला हवं.

गण्या -: काय म्हणाले ते ?

मन्या -: "लोकांना समाधान वाटतं म्हणून पोलिसांच्या कृत्याचं सार्थक केलं, तर पोलीस कायदा हातात घेतील. झटपट न्याय मिळाल्यानंतर आनंद होणे स्वाभाविक आहे. चंबळेचे दरोडेखोर झटपट न्याय द्यायचे, परंतु शेवटी ते दरोडेखोर होते," असे ते म्हणाले व्हते.

संत्या -: आरं या एका परकरणाचा  निकाल असा लागला. बाकीच्या हजारो बलात्कार प्रकरणांचं काय?

गण्या -: मात्र बलात्कार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे.  

मन्या -: पण ती सुद्धा झटपट व्हायला हवी. तरच अशा प्रवृत्तीला आळा बसेल.

संत्या -: आरं शेरात अशा घटना घडतात तवा त्यावर लगेच संताप व्यक्त व्हतो.

गण्या -: खेड्या-पाड्यात तर गरिबांच्या पोरी तरी कुठं सुरक्षित हायत?

मन्या -: जिथे रात्री-अपरातत्री सुद्धा महिला-मुली सुरक्षित राहतील, ते खरं रामराज्य म्हणता येईल.

गण्या -: हां आता हैदप्रकरणात प्रकरणात एन्काऊंटर झालंय, याला न्याय म्हणावं का? हा मुरला प्रश्न उरतोच.

संत्या -: बराबर हाय. एन्काऊंटर झाल्यानं या परकरणातील अन्य जबाबदार यंत्रणांच्या बेजबाबदारीवर पण पडदा पडलाच की.

मन्या -: म्हणूनच न्यायालयाचं काम न्यायालयालाच करून देणं योग्य नाय काय?

 

मागे

मुद्दा राष्ट्रीयत्वाचा
मुद्दा राष्ट्रीयत्वाचा

आपल्या देशातील घुसखोरांना शोधून काढण्यासाठी आता राष्ट्रीयत्वाचा मुद्दा ऐ....

अधिक वाचा

पुढे  

"मौन की बात"

            पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेली ५ वर्षे सातत्याने आपल्या....

Read more