ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एम. वनिता यांना चांद्रयान-3 मोहिमेतून डावलले

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 18, 2019 02:22 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एम. वनिता यांना चांद्रयान-3 मोहिमेतून डावलले

शहर : देश

            भारताच्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-३ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. रितू कारिधाल यांना चांद्रयान-३ मोहिमेच्या संचालकपदी कायम ठेवण्यात आले आहे. चांद्रयान-२ मोहिमेतही त्यांच्याकडे संचालकपदाची जबाबदारी होती. वनिता यांच्या जागी पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प संचालक असणार आहेत.

          वनिता यांच्या टीमकडे चांद्रयान-२ मिशनमधील सर्व सिस्टिम्सची जबाबदारी होती. याच सिस्टिमचा भाग असलेल्या विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले होते. वनिता यांच्या बदलीमागे नेमके काय कारण आहे ते इस्रोने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. चांद्रयान-२ मोहिमेच्या संचालकपदी रितू कारिधाल आणि प्रकल्प संचालकपदी वनिता यांची नियुक्ती केल्यानंतर इस्रोचे मोठया प्रमाणात कौतुक करण्यात आले होते.

          इस्रोच्या २८ नोव्हेंबरच्या पत्रकामध्ये एम.वनिता यांच्या बदलीची माहिती देण्यात आली आहे. “एम.वनिता या उत्तम शास्त्रज्ञ असून त्या सध्या चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांची आता पीडीएमएसएच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात येत आहे. इस्रोच्या मुख्यालयात कार्यरत असणारे पी. वीरामुथुवेल यांची चांद्रयान-३ च्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.”

         पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प व्यवस्थापन टीमचेही प्रमुख असणार आहेत. इस्रोने सात डिसेंबर रोजी काढलेल्या दुसऱ्या आदेशात ही माहिती दिली आहे. मिशनचे वेगवेगळे टप्पे लक्षात घेता इस्रोने प्रकल्प संचालकांबरोबर २९ उप प्रकल्प संचालकांची निवड केली आहे. त्यांच्याकडे लँडर आणि रोव्हरची महत्वाची जबाबदारी असेल.
 

मागे

विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीची लूट
विद्यार्थ्यांची संख्या अधिक दाखवून कोट्यवधी रुपयांच्या सरकारी निधीची लूट

       चंद्रपूर - कोरपना तालुक्यातील कोडशी आश्रम शाळेत हा गैरप्रकार उघड....

अधिक वाचा

पुढे  

येणा-या वर्षांत तरुणांसाठी भरघोस नोक-या
येणा-या वर्षांत तरुणांसाठी भरघोस नोक-या

           मुंबई – येणार्याी वर्षांत कोणत्याही क्षेत्रात नोकरी मिळण....

Read more