ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

इच्छा असूनही निर्माते ओटीटीवर ‘ॲनिमल’ करू शकणार नाही प्रदर्शित; कारण..

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 16, 2024 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

इच्छा असूनही निर्माते ओटीटीवर ‘ॲनिमल’ करू शकणार नाही प्रदर्शित; कारण..

शहर : मुंबई

संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित 'ॲनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. यामध्ये रणबीर कपूर, रश्मिका मंदाना, अनिल कपूर, बॉबी देओल, सिद्धार्थ कर्णिक, तृप्ती डिमरी यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाने देशभरात 900 कोटी रुपयांपेक्षा अधिक गल्ला जमवला आहे.

संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘ॲनिमल या चित्रपटाचा सहनिर्माता असल्याचा दावा करत ‘सिने वन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेडने कोर्टात धाव घेतली आहे. टी-सीरिजने चित्रपटाच्या इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्समधील आपला वाटा दिला नाही, असा आरोप त्यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात खटला दाखल केला आहे. सिने वन स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेडने म्हटलंय की दोन प्रॉडक्शन हाऊसदरम्यान चित्रपटाच्या बाबतीत एक करार झाला होता. या कराराअंतर्गत 35 टक्के नफ्यातील भाग आणि 35 टक्के इंटलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट्समधील भाग त्यांना मिळणार होता. मात्र टी-सीरिजसोबत मिळून स्वाक्षरी केलेल्या 2019 च्या अधिग्रहण करारातील विविध कलमांचं उल्लंघन केल्याचा दावा त्यांनी केला आहे. इतकंच नव्हे तर ‘ॲनिमल हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करू नये, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

“टी-सीरिजने नफ्याचा भाग दिला नाही

सिने वन स्टुडिओजने असा आरोप केला आहे की टी-सीरिजने ‘ॲनिमल हा चित्रपट बनवण्यासाठी, प्रमोट करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी पैसा खर्च केला. मात्र त्यांनी बॉक्स ऑफिसवरील कमाईचा कोणताही तपशील न सांगता महसूल मिळवला आणि नफा वाटणीचा करार करूनही सहनिर्मात्यांना त्यांचे पैसे दिले नाहीत. सिने वनचा खटला लढणारे वकील संदीप सेठी याविषयी म्हणाले, “‘टी-सीरिजकडून सगळा पैसा घेतला जात आहे, पण त्यांनी सिने वनला एकही पैसा दिला नाही. सहनिर्मात्यांचे त्यांच्यासोबत दीर्घकाळापासून संबंध आहेत, पण त्यांच्यासोबत झालेल्या कराराचा ते सन्मान करत नाहीत. संबंध आणि कराराच्या सन्मानापोटी सहनिर्मात्यांनी कोर्टात धाव घेतली आहे. ”

टी-सीरिजने फेटाळले आरोप

दुसरीकडे टी-सीरिजने हे सर्व आरोप फेटाळले आहेत. रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल या चित्रपटात सिने वन स्टुडिओजने एकही पैसा गुंतवला नसल्याचं वकील अमित सिब्बल म्हणाले. 2 ऑगस्ट 2022 रोजी केलेल्या करारातील दुरुस्तीनुसार, सिने वन स्टुडिओजने 2.6 कोटी रुपयांसाठी त्यांचे सर्व इंटलेक्चुअल हक्क सोडले आहेत. “दुरुस्तीबद्दलची ही माहिती त्यांनी लपवली आहे. त्यांना 2.6 कोटी रुपये आधीच मिळाले आहेत. त्यांनी चित्रपटात एकही पैसा गुंतवलेला नाही, तरीसुद्धा त्यांना 2.6 कोटी रुपये मिळाले आहेत, असं सिब्बल यांनी स्पष्ट केलंय.

सुनावणी पुढे ढकलली

करारातील दुरुस्तीबद्दलची माहिती तपासल्यानंतर न्यायालयाने सिने वन स्डुडिओजचे वकील सेठी आणि ब्रिफिंग काऊन्सिल यांना विचारलं की त्यांना याबद्दलची माहिती आहे का? त्यावर त्यांनी नकारार्थी उत्तर दिलं. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी गुरुवारपर्यंत पुढे ढकलली आहे.

ॲनिमलच्या ओटीटी रिलीजवर स्थगितीची मागणी

अंतरिम सवलतीच्या अर्जात सिने वन स्टुडिओजने चित्रपटाच्या ओटीटी रिलीजवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत टी-सीरिजकडून करारातील अटींचं पालन केलं जात नाही, तोपर्यंत नेटफ्लिक्सवरॲनिमलहा चित्रपट प्रदर्शित करू नये, अशी मागणी सहनिर्मात्यांनी केली आहे.

मागे

करण जोहर याचं सेक्शुएलिटीवर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आयुष्यातील इतकं मोठं सत्य…’
करण जोहर याचं सेक्शुएलिटीवर मोठं वक्तव्य; म्हणाला, ‘आयुष्यातील इतकं मोठं सत्य…’

'आयुष्यातील इतकं मोठं सत्य...', करण जोहर याचं स्वतःच्या सेक्शुएलिटीवर लक्ष....

अधिक वाचा

पुढे  

वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट
वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट

ट्विंकलने आजवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. 'मिसेस फनीबोन्स', 'पजामास आर फर....

Read more