ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 07, 2020 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!

शहर : मुंबई

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणात अखेर रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जामीन मिळाला आहे.  या आधी 3 वेळा तिचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. आज (7 ऑक्टोबर) रियाचा जामीन अर्ज  (Bail Application)मंजूर करण्यात आला आहे. मात्र, तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे

रियाला 8 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं, मात्र व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज ((Bail Application) फेटाळून लावण्यात आला होता. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती.

जामीन मिळण्यास दिरंगाई का?

अभिनेत्री रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty) हिला एनसीबीने कलम 27 (A) अंतर्गत अटक झाली होती. ड्रग्ज तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा हा गुन्हा आहे. त्यानुसार 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही.

रियाच्या अटकेच्या चार दिवस आधी तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली होती.

जामिनासाठी धावाधाव

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला 6 ते 8 सप्टेंबर या काळात एनसीबीने चौकशीसाठी बोलावलं होतं. 8 सप्टेंबरला तिला अटक झाली. 8 सप्टेंबर रोजी रियाला 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याचवेळी तिने महानगर दंडाधिकारी न्यायालयात जामिनासाठी अर्ज (Bail Application)केला होता, मात्र तो अर्ज कोर्टाने फेटाळला होता.रियाने 9 सप्टेंबर रोजी मुंबई सेशन कोर्टातील एनडीपीएस विशेष कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता. 11 सप्टेंबर रोजी सेशन कोर्टाने तिचा जामीन अर्ज फेटाळला होता.

रिया आणि शौविक यांनी 22 सप्टेंबर रोजी रिया आणि शौविक या दोघांनी मुंबई हायकोर्टात जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला. त्यावर 23 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार होती. पण पावसामुळे कोर्टाला सुट्टी असल्याने जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली गेली.या दोघांच्या जामीन अर्जावर 30 सप्टेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर न्यायाधीश सारंग व्ही. कोतवाल यांनी त्यावरील निर्णय राखून ठेवला होता.

जामिनानंतर रियासमोर कोर्टाच्या तीन अटी

मुंबई हायकोर्टाने रियाला दिलासा असला तरी तिला काही अटी घालण्यात आल्या आहेत. या अटींनुसार रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचा आदेश देण्यात आला आहे. याशिवाय तिला मुंबईबाहेर जायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक असणार आहे.  चौकशीदरम्यान पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे.

मागे

'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण
'...त्यावेळी मी खूप रडायचो', आमिर खानने सांगितला आयुष्यातला सर्वात कठीण क्षण

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या त्याचा आगामी चित्रपट ‘लाल स....

अधिक वाचा

पुढे  

Sana Khan | आता पुढचा प्रवास मानवतेच्या शोधात, सलमानच्या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला अलविदा!
Sana Khan | आता पुढचा प्रवास मानवतेच्या शोधात, सलमानच्या अभिनेत्रीचा चित्रपटसृष्टीला अलविदा!

‘बिग बॉस’ची उपविजेती आणि सलमान खानची सह-अभिनेत्री सना खानने (Sana Khan) आपल्या ....

Read more