ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

फसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 29, 2020 09:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

फसवणूक प्रकरणात विक्रम गोखलेंना दिलासा नाहीच, अटकपूर्व जामीन फेटाळला

शहर : मुंबई

जमीन विक्री प्रकल्पात फसवणूक (Cheating Case) केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल झाल्यावर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंगळवारी (29 सप्टेंबर) फेटाळून लावला. या प्रकरणात विक्रम गोखलेंसह जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी या दोघांविरूद्ध यावर्षी मार्च महिन्यात शहरातील पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, त्याचा सखोल तपास आवश्यक असल्याचे कारण देत, अतिरिक्त सत्र न्यायाधीश माधुरी देशपांडे यांनी गोखले यांची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळून लावली असल्याचे, वकील पुष्कर सप्रे यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पुण्यात मुळशी तालुक्यातील डोंगरगाव मधील जमिनीची स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बेकायदा विक्री करुन 14 जणांची फसवणूक केल्याचा गोखलेंवर (Vikram Gokhale) आरोप लावण्यात आला आहे. विक्रम गोखले यांच्यासह तिघांनी 96 लाख 99 हजार रुपयांना फसवणूक (Cheating Case) केल्याची तक्रार जयंत प्रभाकर बहिरट यांनी दिली होती.जयंत म्हाळगी आणि सुजाता म्हाळगी यांनी 25 वर्षांपूर्वी सुजाता फार्म प्रा. लिमिटेड स्थापन करुनगिरीवन प्रोजेक्ट कंपनीची स्थापना केली होती. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हेगिरीवन प्रोजेक्टचे अध्यक्ष आहेत. हा प्रोजेक्ट सरकारमान्य असल्याचा दावा करुन त्यांनी खोटी प्रलोभने देऊन प्लॉटधारकांना आकर्षित केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

विना हरकत मोजण्या करुन घेण्याचा आदेश असताना संचालक वेळोवेळी हरकत घेत होते. प्लॉटधारकांनी मोजणी करुन घेतल्यावर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच, गिरीवन प्रोजेक्ट हा प्रायव्हेट हिल स्टेशन असल्याचं सांगून फसवल्याचा (cheating Case) दावाही फिर्यादीनी केला आहे.

पैसे देऊनही जमिनींचा ताबा नाही

तक्रारदार असलेल्या 14 जणांना जाणूनबुजून चुकीच्या गटात खरेदीखत देणे, खरेदीखतात दिलेल्या गटापेक्षा जवळ जवळ दीड किमी लांब पझेशन देणे, खरेदी खतात दिलेला गट आणि पझेशन दिलेला गट सारखा नसणे, काहींना आजपर्यंत पझेशन घेऊ देणे, पैसे घेऊन खरेदीखताप्रमाणे क्षेत्र देणे, खरेदी केलेल्या प्लॉटवर जाऊ देणे, अशा विविध प्रकारे या प्लॉटधारकांची फसवणूक केली आहे.

प्लॉटधारकांची एकूण 96 लाख 99 हजार रुपयांची फसवणूक (Cheating Case) झाली असल्याचा दावा केला होता. या सर्वांवर 420, 465, 468, 341, 447, 427, 34 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मागे

'शांतता.. तपास चालू आहे'; सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चर्चांना उत्तर
'शांतता.. तपास चालू आहे'; सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून चर्चांना उत्तर

गेल्या महिन्याभरापासून सीबीआय सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास करू ला....

अधिक वाचा

पुढे  

रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा
रिया चक्रवर्तीने जाणिवपूर्वक केलं हे काम, एनसीबीचा मोठा खुलासा

सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाची चौकशी करणाऱ्या एनसीबीसमोर रोज धक्कादा....

Read more