ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नात्यांचे पदर दाखवणारी ‘दाह’ कथा, लवकरच मोठ्या पडद्यावर

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2019 07:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नात्यांचे पदर दाखवणारी ‘दाह’ कथा, लवकरच मोठ्या पडद्यावर

शहर : मुंबई

         प्रत्येकाच्या आयुष्यात नात्याला खूप महत्त्व असतं आणि नात्यांच्या सहवासामुळे अनेक दु:खं सहन करण्याची ताकद मिळते तर सुखी क्षणांचा आनंद साजरा करायला सोबत मिळते. मग ती नाती आपली किंवा परकी असा भेदभाव नसला तरी मायेची, प्रेमाची भावना त्यामध्ये असते. नात्यांचे महत्त्व पटवून देणारा एक नवा कोरा मराठी चित्रपट ‘दाह एक मर्मस्पर्शी कथा’ नवीन वर्षात प्रेक्षकांच्या भेटीस येतोय.

       युगंधर क्रिएशन्स प्रस्तुत आणि अनिकेत राजकुमार बडोले निर्मित ‘दाह’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मल्हार गणेश यांनी केली आहे तर डॉ. सतिश (अतुल) सोनोने यांनी कथा लिहिली आहे. या चित्रपटात मराठी मालिका आणि चित्रपटातील सुप्रसिध्द अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेते गिरीश ओक यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यांच्यासह राधिका विद्यासागर, सुहृद वार्डेकर, यतिन कार्येकर, उमा सरदेशमुख, किशोर चौघुले यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत.

        ‘दाह’ चित्रपटाची कथा ही कौटुंबिक आहे. अतिशय धार्मिक आणि आदर्श वाटाव्यात अशा सौ. साने आणि सुप्रसिध्द डॉक्टर श्री. साने या सुखी जोडप्याची ही गोष्ट आहे. त्यांची मुलगी ‘दिशा’च्या येण्याने त्यांच्या संसारात सुख आणि आनंद नांदू लागते. पण हा आनंद किती काळ टिकेल? दिशा ही त्यांची पोटची मुलगी आहे की दत्तक? दत्तक घेतली असेल तर तिचा स्वीकार आनंदाने केला जाईल का? या सर्व प्रश्नांची उत्तरे नवीन वर्षात मिळतील.

मागे

किशोरी शहाणे हिन्दी वेबसिरीजमध्ये पाहिल्यांदा झळकणार
किशोरी शहाणे हिन्दी वेबसिरीजमध्ये पाहिल्यांदा झळकणार

        मराठी चित्रसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे ही आता बि....

अधिक वाचा

पुढे  

बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या?
बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीची आत्महत्या?

          बॉलिवूड अभिनेता कुशल पंजाबीचं निधन झालं आहे. लक्ष्य, अंदाज, सला....

Read more